Congress candidate selection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress candidate selection : 'स्थानिक'साठी उमेदवार कसा ठरवणार? काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांवर 'वजनदार' निर्णयाची जबाबदारी

North Maharashtra Congress Gives District Presidents Power to Select Local Body Election Candidates – Deep Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरे जाताना उमेदवार निवडीसंदर्भात काँग्रेस पक्षाने उत्तर महाराष्ट्राच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Congress update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार फायनल करताना सर्वाच पक्षातील श्रेष्ठींची दमछाक होणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी मधील पक्ष नेतृत्वांच्या बैठका सुरू आहेत. परंतु काँग्रेसने यावर तोडगा काढून वेगानं निर्णय घेतला.

उमेदवार फायनल करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांवर निश्चित करण्यात आली आहे. यामुळे पक्षात जिल्हाध्यक्षांच्या शब्दांना 'वजन' असणार आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी हा निर्णय घेऊन जिल्हाध्यक्षांना आगामी काळात संघटनेत किती महत्त्व असेल, याचा सूचक संकेत दिला आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नुकताच बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एन. संदीप, माजी खासदार शोभा बच्छाव, आमदार हेमंत उगले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये काँग्रेसने जिल्हाध्यक्षांना 'वजनदार' निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातो.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने जागा वाटप, समविचार पक्षाची वाटाघाटी, आघाड्या करण्यासाठी घेण्यात येणारे निर्णय, मित्र पक्षांची समन्वय आणि चर्चेची जबाबदारी, याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर शहर जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना प्रदा केले आहेत. काँग्रेसचे अहिल्यानगर शहरातील जिल्हाध्य दीप चव्हाण यांनी या माहितीला दुजोरा दिला.

सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षावर अभद्र युती, असे म्हणत जोरदार टीका केली. सत्तेसाठी साम-दम-दंड-भेद, यांचा वापर सुरू आहे. पण ही स्थानिकची निवडणूक एकजुटीने मतभेद विसरून लढल्यास काँग्रेसचा पाया आणखी भक्कम होईल आणि केंद्रात देखील सत्ता परिवर्तन होईल, असे सांगितले.

मतदार याद्यांचा घोळ तपासा

उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र संगमनेर इथं बैठक घेतली. या बैठकींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या. मतदार याद्यांमधील नावे तपासून घ्या, स्थलांतरित मतदार, नव्याने समावेश करण्यात आलेले मतदार, त्यांचे पत्ते, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदारांचा आयडी क्रमांक सर्च होतोय का? याबाबत अलर्ट राहा, असे थोरात यांनी सांगितले.

थोरातांची शहरात एन्ट्री होणार

अहिल्यानगर शहर जिल्हाधक्ष दीप चव्हाण यांनी शहरात वाढलेल्या जातीय आणि धार्मिक तेढचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. यावर बाळासाहेब थोरात यांनी पुढील आठवड्यात जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांची शिष्टमंडळासह भेट घेऊ आणि परिस्थिती सुधारण्याची मागणी करू. यातूनही तोडगा न निघाल्यास मोर्चा काढू, तसं मोर्चासाठी जोरदार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT