Bhai Jagtap
Bhai Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhai Jagtap News: मुंबईतील वीजबिलांच्या वसुलीवरून भाई जगतापांचा अदानींना झटका !

Sampat Devgire

Mumbai Issue News: मुंबई शहरात बेस्टतर्फे वीजेचा पुरवठा होतो. मात्र त्यात आता अदानी समूहाने शिरकाव केला आहे. राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने प्रीपेड मीटरव्दारे बिलांची वसुली करण्याचे काम या समूहाला दिले आहे. गरीबांना संकटात लोटणारा हा निर्णय तातडीने थांबवा अशी मागणी करत काँग्रेस नेते भाई जागतापांनी अदानींना झटका दिला आहे. (Congress leader Bhai Jagtap warns state government on electricity issue)

यासंदर्भात आज काँग्रेसचे (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी विधान परिषदेत भाजप (BJP) सरकारने हा निर्णय थांबवावा आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी केली.

नियम २८९ च्या नियमात हा विषय बसत नसल्याचे सांगत सभापतींनी हा प्रस्ताव नाकारला, मात्र त्यावर दहा मिनीटांची चर्चा करण्यास मान्यता दिली.

यासंदर्भात श्री. जगताप म्हणाले, मुंबई शहर व उपनगरांत बेस्टद्वारे वीज पुरवठा केला जातो. या बेस्टची स्थिती हालाखीची आहे. चालकांना पगार न मिळाल्याने ते उपोषण करीत आहेत. मात्र त्याच वेळी राज्य व केंद्र सरकारने एक निर्णय घेऊन मागच्या दाराने अदानी समूहाच्या हाती कारभार देण्याचे काम सुरू केल्याची टिका त्यांनी केली.

ते म्हणाले, बेस्टचे १०.५० लाख ग्राहक आहेत. त्यांना वीजेचे ४३ लाख प्रीपेड मीटर्स बसविण्याचे काम अदानी समूहाले दिले आहे. तेरा हजार कोटींचा हा प्रकल्प असून त्यात ८,२०० कोटी बेस्ट तर १३०० कोटी रुपये केंद्र सरकार अदानी समूहाला देणार आहे. हा निर्णय जनहिताचा नाही.

ते म्हणाले, मुंबई शहर आणि उपनगरांत ४० टक्के ग्राहक झोपडपट्टीतील आहेत. ३० टक्के ग्राहक मध्यमवर्गीय आहेत. या लोकांचे वेळेवर पगार होत नाहीत. आर्थिक अडचणी असतात. अशा स्थितीत मोबाईल डाटासारखे आधी पैसे भरा, पैसे संपले की वीज बंद होणार हे धोरण गरीबांचे शोषण करणारे आहे. गरीबांना लुटण्याचा हा प्रकार आहे. एक दिवस जरी लेट झाली तरी वीज पुरवठा आपोआप खंडीत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने थांबवावा. यावर शासनाने निवेदन करावे, भूमिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT