Sudhir Mungantiwar Announcement: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २५ लाख भरपाई!

Forest Minister Sudhir Mungantiwar made Announcement: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन्य प्राण्यांच्या नागरिकांवरील हल्ल्यांबाबत सुधारीत प्रस्ताव सादर केला.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Leopard Attacks In State : राज्यात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव तसेच वरचेवर होणाऱ्या हल्ले याबाबत आज राज्य शासनाने आपले नवे धोरण जाहीर केले आहे. त्यात भरपाईच्या रक्कमेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. विदर्भात वाघांचा तर राज्याच्या अन्य भागांत बिबट्यांचा वावर लगतच्या वस्त्यांत होतो आहे. त्यातून नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले होतात. याबाबत वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भरपाईच्या रक्कमेत लक्षणीय वाढ केली आहे.

Sudhir Mungantiwar
BJP MP Bhamre on Manipur Issue: भाजप खासदार भामरेंच्या मतदारसंघात आदिवासींचा एल्गार!

याविषयी गेल्या आठवड्यात वनमंत्र्यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. मात्र भरपाईची रक्कम तसेच अन्य विषयांबाबत सदस्यांनी विविध सुचना केल्या होत्या. या सुचनांची दखल घेण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले होते.

Sudhir Mungantiwar
Deepika Chavan On Manipur: सटाण्यातील आदिवासी बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

आज मंत्र्यांनी विधान परिषदेत त्याची घोषणा केली. यामध्ये राज्य शासनाकडून द्यावयाच्या भरपाईच्या रक्कमेत लक्षणीय वाढ करण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्याला २५ लाख रूपये भरपाई मिळेल. याशिवाय कायमचे अपंगत्व आल्यास ७.५० लाख, जखमी झाल्यास ५ लाख आणि किरकोळ जखमी झाल्यास ५० हजारांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. या घोषणेचे सदस्यांनी स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com