Nana Patole & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Congress: रावेर मतदारसंघासाठी नाना पटोले करणार चाचपणी!

Sampat Devgire

Congress Loksabha election : खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देणार, की टाळणार यावरून राजकारण तापलेले असतानाच, महाविकास आघाडीतदेखील या जागेसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. (Congress also claim for Raver constituency after NCP Ajit Pawar group)

भाजप (BJP) विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी न देता नव्या चेहऱ्याचा विचार करीत आहे. त्यातच त्यांचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार) पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. आता हा मतदारसंघ काँग्रेसला (Congress) सोडावा, अशी मागणी करण्याची शक्यता आहे.

रावेर (जळगाव) लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीत मागणी करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शनिवारी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या वेळी ते लोकसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण काँग्रेसचा आढावा घेतील.

कॉंग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी माहिती दिली. या वेळी ज्ञानेश्‍वर कोळी, सुभाष जाधव-देशमुख, संदीप घोरपडे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शनिवारी दौरा आहे. त्यासाठी शुक्रवारी त्यांचे आगमन होईल. शनिवारी सकाळी नऊला पटोले काँग्रेस भवनाला भेट देतील. त्यानंतर ते गोदावरी महाविद्यालयात जळगाव शहर आणि ग्रामीणच्या बैठकीसाठी उपस्थित राहतील. या वेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतील.

रावेर मतदारसंघातून भाजप विद्यमान खासदार खडसे यांना उमेदवारी टाळणार व नव्या इच्छुकांना तयारीसाठी संकेत देणार, याची चर्चा सुरू आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) एकनाथ खडसे यांनी उमेदवारी करावी, अशी पक्षाची इच्छा आहे. असे असताना भाजपचा सहकारी मित्र अजित पवार गटाने हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी केली होती. त्या पाठोपाठ काँग्रेस पक्षानेही तयारी केल्याने निवडणुकीआधीच रावेर मतदारसंघ चर्चात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT