Baramati News : अजितदादांच्या कार्यक्रमाला विरोध कायम; बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा-प्रशासनातील बैठक फिस्कटली

Maratha Reservation : आंदोलनानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला कारखाना आणि पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
Maratha community -police Meeting
Maratha community -police MeetingSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर बोलाविण्यात आलेली मराठा क्रांती मोर्चा, कारखाना आणि पोलिस प्रशासनाने बोलावलेली बैठक फिस्कटली. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला विरोध कायम ठेवला, तर नियोजित कार्यक्रम असल्याने तो होऊ द्यावा, सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी भूमिका कारखाना आणि पोलिस प्रशासनाने मांडली. मात्र, सकल मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिला आहे, त्यामुळे उद्या (ता. २८ ऑक्टोबर) बारामतीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maratha community continues to oppose Ajit Pawar's program in Baramati)

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उद्या (ता. २८ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला आमचा विरोध कायम आहे. आम्ही बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha community -police Meeting
Maratha Reservation : मोहोळमधील २१, तर माळशिरसमधील २० गावांत नेत्यांना ‘नो एन्ट्री’

सकल मराठा समाज कुठल्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा होऊ देणार नाही. त्यानंतरही कार्यक्रम झाला तर मात्र आम्ही आंदोलन करणार. आंदोलनानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला कारखाना आणि पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये, अशी आक्रमक भूमिका बैठकीत घेतली.

माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. कारखान्याचे संचालक अथवा सभासदांनी मोळी पूजन करावं; पण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमला बोलावू नये, अशी मागणीचे पत्रक सकल मराठा समाजाकडून काढण्यात आलं आहे.

आंदोलन करताना सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. माळेगावचा कार्यक्रम हा नियोजित आहे, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. आजवर समाजाने शांततेत मोर्चो काढले आहेत, तोच आदर्श मोळीच्या कार्यक्रमाला दिसावा, अशी विनंती अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केली.

Maratha community -police Meeting
Maratha Reservation : बारामतीत अजितदादांच्या कार्यक्रमास विरोध; प्रशासनाने तातडीने बोलावली बैठक

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम हा नियोजित आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमची पाठिंब्याची भूमिका आहे. हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तो होऊ द्यावा, अशी भूमिका कारखाना प्रशासनाने मांडली.

या वेळी माळेगाव कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक रंजन तावरे, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, तानाजी कोकरे, संजय काटे, बंशीलाल आटोळे, सुरेश खलाटे, मंगेश जगताप, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशांत सातव, कार्यकारी संचालक अशोक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक किरण अवचार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Maratha community -police Meeting
Sule Reply To Modi : मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; ‘याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com