Manoj Jarange-Patil Picture 
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील आता बराक ओबामा, मोदींच्या पंक्तीत!

Now Manoj Jarange-Patils : येवल्यातील पैठणी कारागिरांनी आठवडाभर परिश्रम घेऊन विणले जरांगे पाटील यांचे चित्र

Sampat Devgire

Manoj Jarange- Patil News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बिगरराजकीय आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील अल्पावधीतच अनेक घटकांत लोकप्रिय झाले आहेत. येवल्यातील पैठणी कारागिरांनी त्यांचे चित्र चक्क पैठणीच्या रेशमी शेल्यावर विणले आहे. (The embroider made Jarange-Patil`s picture on Traditional Paithani saree)

मराठा आरक्षण (Maratha) आंदोलनाने अनेक घटकांमध्ये (Nashik) व्यापले आहे. यानिमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारला (Maharashtra) या प्रश्नावर सातत्याने संदेश दिले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याआधी कोणाच्या प्रतिमा साकारल्या पैठणीवर

याबाबतचे उदाहरण म्हणजे नाजूक, कलाकृतींनी सजलेली पैठणी म्हणजे येवल्याची ऐतिहासिक ओळख. येथील काही हौशी तरुण विणकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिर्डीचे साईबाबा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या प्रतिमा पैठणीवर साकारल्या. देशभर चर्चेत असलेले, सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा पैठणीच्या शेल्यावर विणली आहे. त्यामुळे जरांगे पाटील अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्या रांगेत बसले आहेत.

अस्सल सौंदर्य अन्‌ कशिदाकारीमुळे कलात्मक परिधान केलेली स्त्री शंभरात उठून दिसते. एवढी पैठणी महावस्त्राची ताकद. ही देखणी पैठणी आपल्या नानाविध रंगसगतीमुळे आणि त्यावरील डिझाइन्समुळे महिलांना आकर्षित करते. याच पैठणीवर आता विविध प्रतिमाही साकारत असून, येथील विणकरांनी पैठणीच्या शेलावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा साकारली आहे.

येवला म्हटले, की मराठा आरक्षण आंदोलकांच्या टार्गेटवर असलेले छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. मुंबईत माझगाव या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात पराभूत झाल्यावर शरद पवार यांनी त्यांचे या मतदारसंघात पुनर्वसन केले होते. मात्र, या मतदारसंघात सध्या ते अतिशय वेगाने अलोकप्रिय होऊ लागल्याची चिन्हे रोज डोळ्यांपुढे येतात.

जरांगे पाटील यांचे चित्र पैठणीच्या शेल्यावर विणले आहे. हे चित्र नांदेसर येथील हेमंत जगदाळे व त्यांचे सहकारी विष्णू भोरकडे, तेजस सोनवणे, हर्शद जगदाळे, ऋषिकेश आवारे, भागीनाथ जगदाळे आदींनी सात दिवस परिश्रम घेऊन साकारले आहे. उद्या (ता. २४) अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना ही प्रतिमा भेट देण्याची इच्छा या तरुणांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT