Kirankumar Bakale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आता बकालेंच्या अटकेसाठी शिंदे गटाचा ‘एल्गार’

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी.

Sampat Devgire

पाचोरा : मराठा समाजाबद्दल (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले (Police unspector Kirankumar Bakale) यांना निलंबित करण्यात आले असले तरी त्यांना त्वरित पोलिस दलातून बडतर्फ (Suspension) करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ‘एल्गार’ पुकारला असून, तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. (Shinde Group given three days ultimatum on Bakale`s Issue)

त्यानंतर १३ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदन शहरप्रमुख किशोर बारावकर यांनी दिले आहे. बकालेंना पाठीशी घालणारे अधिकारी व कर्मचारी यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत. निवेदन देताना आशीर्वाद इन्फ्राचे मुकुंद बिल्दीकर, तालुकाप्रमुख सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगरसेवक वाल्मीक पाटील, नितीन चौधरी, जितेंद्र पेंढारकर, अरुण ओझा आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT