नाशिक : निवडणूक आयोगाने (ECI) ठाकरे गटाला (Uddhav Thackray) मशाल हे निवडणूक चिन्ह (Election Symbol) दिल्यानंतर वासननगर भागात युवा सेनेतर्फे (Yuva sena) मशाली पेटवून जल्लोष (flame emflbeau)करण्यात आला. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट (Balkrishn Shirsath) यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्हॉट्स ॲपचे डीपी तसेच स्टेटसवर नवीन चिन्ह (Social Media) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नवा लोगो ठेवत जोरदार घोषणाबाजी केली. '(Yuva sena workers welcomes New symbol of Uddhav Thackray Shivsena)
शिवसेना ठाकरेंची, अस्मिता आहे महाराष्ट्राची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी साईनाथ निकम, ऋषी राणे, मोहित पन्हाळे, प्रीतम पाटील, धीरज राऊत, स्वप्नील पारवे, अक्षय बाविस्कर, शुभम शिवदे, रोहित भरीत, दत्तू सोपणार, रवी उगले, दगडू पाटील, अनिकेत राजपूत आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी गद्दार व शिवसेना संपविण्याचा कुटील डाव रचलेल्या एकनाथ शिंदे गटाचे येत्या निवडणुकीत कायमचे विसर्जन होईल असे सांगितले. शिवसेनेचे कार्यकर्ते खोके नव्हे नीष्ठेसाठी ओळखले जातात. एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या साथीने केवळ सत्तेच्या हव्यासापोटी जे काम केले, त्याला जनता कधीही माफ करणार नाही. हे सर्व महाराष्ट्र दुबळा करण्याचे राजकारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सुरु आहे. मात्र मशाल चिन्ह देखील एका दिवसात जनतेच्या प्रेमास पात्र छरेल व विरोधकांचे डाव उलटा पडेल, असा दावा या कार्यकर्त्यांनी केला.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले ,पण शिवसैनिकांचे रक्त पेटवले .हे पेटलेलं रक्त निश्चितपणे शांत होणार नाही .त्यात मशाल हे चिन्ह आता मिळाले आहे. त्यामुळे धगधगत्या मशाली प्रमाणे आता पेटलेला शिवसैनिक अधिक पेटून उठेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.