BJP OBC Cell Meeting at Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

७० टक्के ओबीसी समाजाने मतदान केल्यानेच योगी आदित्यनाथ विजयी झाले!

मालेगाव येथे भाजपच्या ओबीसी आघाडीची बैठक झाली.

Sampat Devgire

मालेगाव : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीत ७० टक्के ओबीसी (OBC) समाजाने भाजपला (BJP) मlतदान केल्यामुळेच राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपला दणदणीत विजय मिळाला अशी माहिती भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिली.

ते म्हणाले, २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता मिळविण्यासाठी ओबीसी समाजाच्या पाठिंब्याची नितांत आवश्यकता असल्याने कार्यकर्त्यांनी या समाजातील अठरा पगड जातीसमुहांवर लक्ष केंद्रित करुन त्यांना पक्षाशी जोडून ठेवावे.

आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या ओबीसी आघाडी मालेगाव जिल्हा शाखेची बैठक सोमवारी (ता.४) शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी युवानेते अद्वय हिरे, मनपा भाजप गटनेते सुनील गायकवाड, आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, सचिव मनोज ब्राम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले.

श्री. चित्ते म्हणाले, ओबीसी समाज हा मूलत: लढवय्या आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराणा प्रताप यांनी लढलेल्या स्वराज्यासाठीच्या लढाईत या समाजातील अठरा पगड जातीसमुह अग्रस्थानी होता. ३५२ जातींमध्ये विखुरलेल्या या समाजाने भाजपचीदेखील सतत पाराखण केली आहे. अशा स्थितीत या समाजाचे विविध प्रश्‍न सोडविण्यावर भर देणे हेही तितकेच महत्वाचे असून, ओबीसी आघाडीने ही जबाबदारी पार पाडावी. राजकीय आरक्षण व अन्य प्रश्‍नांसंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकार चालढकल करीत असल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या या नाकर्तेपणाविरुद्ध पक्षातर्फे वेळोवेळी आंदोलने करण्यात आले. पक्ष स्थापना दिनानिमित्त येत्या ६ ते १३ एप्रिल या कालावधीत विशेष संपर्क अभियान राबविण्यात येत असून, यानिमित्ताने तळागाळातील ओबीसी समाजापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा.

बैठकीस आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ साळवे, जगदीश गोऱ्हे, निंबा महाजन, नंदू शिरोळे, कैलास शेवाळे, कृष्णा अहिरे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT