Chhagan Bhujbal & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांना राष्ट्रवादीचे उत्तर, तुमची ओळख कोणामुळे हे विसरू नका!

OBC leader Chhagan Bhujbal, allegation on Sharad Pawar, Bhujbal's identity due to Sharad Pawar -शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने सुनावले

सरकारनामा ब्युरो

NCP Vs Chhagan Bhujbal News: नागपूर येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या आरोपाचा समाचार घेतला.

नागपूर येथील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केला. आंतरवेली सराटी येथे दगडफेक झाली. त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाच्या आमदाराचा त्यात सहभाग होता असा आरोप केला होता. मंत्री भुजबळ यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी छगन भुजबळ यांना उत्तर दिले आहे. मंत्री भुजबळ हे सुपारी घेऊन शरद पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. वेळ आल्यास त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

मंत्री भुजबळ यांनी १९९१ मध्ये मंडल आयोगासाठी नव्हे तर विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून शिवसेनेतून बाहेर पडले होते, असा दावा राजापूरकर यांनी केला. मात्र तेव्हा ते पद शिवसेनेचे मनोहर जोशी यांना देण्यात आले. नाराजीतूनच भुजबळ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ते पुढे म्हणाले, मंत्री भुजबळ हे १९९१ मध्ये ओबीसी नेते म्हणून पुढे आले. त्यांनाही संधी शरद पवार यांच्यामुळे मिळाली. पवार यांनीच भुजबळ यांना ओबीसी विषयाबाबत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांची ओबीसी नेते अशी ओळख झाली. पवारांमुळेच ही ओळख झाली हे त्यांनी विसरू नये.

मंत्री भुजबळ हे उपमुख्यमंत्री पदासह आतापर्यंत आठ वेळा मंत्री झाले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले. भ्रष्टाचारामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. या कालावधीत देखील ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते, असे राजापूरकर म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यावेळी देखील शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिले. असे असताना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कृतघ्न पणा भुजबळ करीत आहेत. हे सर्व सुपारी घेऊन सुरू असल्याचा पुनरुच्चार राजापूरकर यांनी केला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT