Bacchu Kadu Politics: बच्चू कडू यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप, दिला 'हा' इशारा...

Bachchu Kadu alleges, Minister Gulabrao Patil misuses power, Police case registered due to farmers' protest -बच्चू कडू, उन्मेष पाटील यांसह १३ नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी आक्रोष मोर्चा आंदोलनाचा वाद चिघळणार
Gulabrao Patil & Bachhu Kadu
Gulabrao Patil & Bachhu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu Vs Gulabrao Patil News: कर्जमाफी आणि जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या प्रश्नावर गुरुवारी जळगावला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह विविध नेत्यांनी त्याला हजेरी लावली. यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील शेतकरी पोलिसांच्या सूचना न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

या मोर्चावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या चांगलीच जुंपली आहे. गुलाबराव पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. पोलिसांवर दबाव आणून आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला, आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

Gulabrao Patil & Bachhu Kadu
Rohit Pawar On Chhagan Bhujbal : फडणवीसांची प्रशंसा करणाऱ्या भुजबळांच्या कच्च्या अभ्यासाची पवारांकडून चिरफाड; अंतरवाली सराटीमधील लाठीचार्ज गृहमंत्रालयाच्या आदेशानेच

या मोर्चा संदर्भात माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार बच्चू कडू, शिवसेनेचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा अध्यक्ष कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, एजाज मलिक, संग्राम सिंग सूर्यवंशी, सुनील देवरे, शिवराज पाटील आदी तेरा नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gulabrao Patil & Bachhu Kadu
Ahilyanagar Congress leaders resignation : 'मविआ'तच उलथापालथी; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत 'मातोश्री' गाठली

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने शेतकरी आक्रोश मोर्चाचे नेते संतप्त झाले आहेत. शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त असताना त्यांच्या मागण्या सोडविल्या जात नाहीत. मात्र पोलिसांकडून राजकीय दबाव टाकून गुन्हे दाखल केले जातात.

पोलिसांनी केलेली कारवाई सूडबुद्धीची आहे. परवानगी घेऊन शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले त्याला प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेतले नाही तर जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

शेतकरी आक्रोश मोर्चा आता चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने माजी आमदार कडू यांनी पालकमंत्री यांच्यावर थेट आरोप केले आहेत. जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गुलाबराव पाटील व्यक्तिगत प्रतिष्ठेसाठी सत्तेचा वापर करीत आहेत, असे कडू म्हणाले.

यानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यात राजकीय वाद रंगला आहे. बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला आहे. यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील विरोधी पक्ष एकवटण्याची शक्यता आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com