Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole and OBC : काँग्रेसमध्ये 'OBC' पदाधिकाऱ्यांना मिळणार मोठ्या जबाबदाऱ्या?

Congress OBC News : ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी ओबीसी घटकांचे प्रभावक्षेत्र असलेल्या १७ मतदारसंघात माळी समाजाला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Sampat Devgire

Congress Politics News: विविध पक्षांकडून सध्या OBC कार्ड खेळले जात आहे, काँग्रेसनेही त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच पक्षाच्या संघटनेत ओबीसींना स्थान दिले जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी राज्यभरातील माळी समाजाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. माळी समाजाच्या कार्यकर्त्यांवर यापुढे अधिक मोठ्या जबाबदाऱ्या देण्याचे संकेत यावेळी पटोले यांनी दिले.

यावेळी पक्षाचे ओबीसी(OBC) सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी ओबीसी घटकांचे प्रभावक्षेत्र असलेल्या १७ मतदारसंघात माळी समाजाला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. माजी आमदार दीप्ती चौधरी आणि कृष्णराव इंगळे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला. गेल्या काही निवडणुकांमध्ये विविध जिल्ह्यात माळी समाजाला उमेदवारी देताना डावलण्यात आले. पक्षाला मजबूत करण्यासाठी माळी समाजाला उमेदवारी प्राधान्य द्यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

पक्षाच्या संघटनात्मक आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडताना माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आजवर खूप काम केले आहे. पक्षाच्या विस्तारासाठी या समाजाचे मोठे योगदान आहे. याचा विचार करून पक्षाने कार्यकर्त्यांना संधी द्यावी, मात्र तसे होत नाही. अशी तक्रार यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) म्हणाले, 'आगामी काळात काँग्रेस पक्ष तळागाळात जाऊन सामान्यांना विश्वास देण्याचे काम करणार आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा केली, त्यातून सर्व समाज घटकांना एकत्र करण्याचे काम पक्षाने केले आहे. आगामी काळात जातीनिहाय जनगणना हा पक्षाचा प्राधान्य क्रम असेल, या जनगणनेनंतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता पक्ष घेणार आहे.'

तसेच यावेळी त्यांनी स्वतःचा अनुभव देखील सांगितला, ते म्हणाले 'मी देखील विधानसभा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणनेचा ठराव मांडला व मंजूर केला. त्यानंतर अन्य राज्यांनी देखील त्याचे अनुकरण केले बिहार सरकारने प्रत्यक्ष जनगणना केली. मात्र केंद्र सरकारच्या अख्त्यारित असल्याने न्यायालयाने त्यांचा ठराव फेटाळला आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष देशात सत्तेत आल्यानंतर जातीनिहाय जनगणना केली जाईल. तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे.'

राज्यात सध्या अन्य पक्ष ओबीसी कार्ड खेळत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे ओबीसी नेते म्हणून सातत्याने हा विषय मांडत असतात. आता काँग्रेसने देखील याकडे आपल्या मोर्चा वळवला आहे त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्ष ओबीसी समाज घटकांसाठी सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

या बैठकीला कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी माजी आमदार दीप्ती चौधरी माजी आमदार कृष्णराव इंगळे ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत प्रवीण जांभळे दिगंबर राऊत यांसह विविध वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT