OBC leader Bhujbal letter : तेलंगना राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणावरून, राज्यातील ओबीसी तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ चांगले संतापले आहे.
या प्रकरणी चौकशी होऊन, संबंधितांना कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. मंत्री भुजबळ यांच्या पत्रावर केंद्र सरकार या प्रकरणाची किती दखल घेऊन कारवाई करते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात शनिवारी घडली. त्यावरुन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावरील हल्ला हा समाजिक समता, शिक्षा आणि मानवतावदी विचारधारेवरील हल्ला असल्याचे मंत्री भुजबळांनी (Chhagan Bhujbal) आपल्या पत्रात म्हटले आहे.
महात्मा फुले यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा दाखल देताना, केंद्र सरकारने (Central Government) हे प्रकरण हलक्यात घेऊ नये, असे सूचकपणे म्हटले आहे. महात्मा फुले यांनी 1848 मधे पहिली महिला विद्यालय स्थापन करत महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनविले. त्यांनी सती प्रथा, बाल विवाह बंद केले, याकडे छगन भुजबळांनी लक्ष वेधले.
तसेच महिलांवरील अत्याचाराविरुध्द संघर्ष केला. जातीभेद मिटवून समाजातील वंचित घटकांना एकत्रित करत क्रांती घडविली. सत्यशोधक समाजाची स्थापना करत त्यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य उभारले. सामाजिक समता प्रस्तापित करणाऱ्या अशा महान व्यक्तित्त्वाच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे, समाजात अशांतता आणि वैमनस्य पसरविण्याचा प्रकार आहे, असा घणाघात भुजबळांनी पत्राद्वारे केला आहे.
'महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. या घटनेवरुन असे दिसते की, समाजातील काही लोकांना आजही इथं समाजिक न्याय, स्त्री शिक्षण व समता यापासून भिती वाटते. तथापि, केंद्रीय गृहमंत्री म्हणून आपणास विनंती आहे की, या प्रकरणाची गंभीर दखल घेवून दोषींवर कठोर कारवाई करा,' अशी मागणी मंत्री भुजबळांनी पत्राद्वारे केली आहे.
'पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांची ओळख पटवा, समाज माध्यमांवर पुतळ्याभोवती असलेल्या गर्दीचे, त्यातून विटंबना करणार्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे, त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करा. विटंबना झालेल्या प्रतिमेच्या जागेवर नवीन पुतळा बसवा. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत,' त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन मंत्री भुजबळांनी पत्राद्वारे केंद्राकडे केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.