Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC Reservation : भुजबळांवरील प्रत्येक टीकेला एल्गार मेळाव्यातून देणार उत्तर

Maratha Vs OBC : जरांगे-पाटील यांच्या प्रत्येक आरोपाला नगरमधील एल्गार मेळाव्यातून उत्तर देण्यासाठी समता परिषद आक्रमक

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

ओबीसींच्या एल्गार परिषदेसाठी नगर सज्ज होत आहे. ही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला खूप महत्त्व आले आहे. सरकारमध्ये असलेल्या मित्रपक्षांकडून टार्गेट होत असलेले मंत्री छगन भुजबळांसाठी ओबीसी समाज नगरमधील एल्गार मेळाव्याच्या एकवटताना दिसतो आहे.

मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्यासंदर्भातील अधिसूचना आणि ओबीसींचे आरक्षणाचे (OBC Reservation) संरक्षण यावरून राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळेच मंत्री भुजबळ जेवढे टार्गेट होतील, तेवढा ओबीसी समाज एकत्र होईल. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण अडचणीत आणणाऱ्यांना एल्गार मेळाव्यातून उत्तर देण्याचा निर्धार समता परिषदेने केला आहे. त्यामुळे नगरमधील एल्गार मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सगेसोयऱ्यासंदर्भातील अधिसूचनेनंतर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थित नगरमध्ये ओबीसी, भटक्या विमुक्तांचा एल्गार मेळावा शनिवारी (3 फेब्रुवारी) क्लेरा ब्रुस हायस्कुलच्या मैदानात दुपारी 3 वाजता होत आहे. ओबीसींचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नगरमधील ओबीसीमधील नेते झटत आहेत.

नगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मेळाव्यासाठी आढावा बैठका होत आहेत. या मेळाव्याला नगर जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातून दोन ते अडीच लाख ओबीसी (OBC) बांधव येतील, असा अंदाज आहे. नगर शहरात ओबीसी समाज बांधव दाखल होताना त्यांच्या नाश्तासह इतर मुलभूत सोयींचे नियोजन करण्यात आले आहे.

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना राज्य सरकारमधून हाकला, अशी मागणी सरकारमधील काही मित्रपक्षांच्या आमदारांकडून होत आहे. यावर ओबीसी समाज आणि नेते आक्रमक होताना दिसत आहे. नगरमधील एल्गार मेळाव्यातून उत्तर द्यायचे, असे नियोजन नगरमधील ओबीसी नेते करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेळाव्यास्थळी पोलिस बंदोबस्तासह शेकडो ओबीसी स्वयंसेवक असतील. महिला स्वयंसेवक देखील असतील. नगर शहरासह जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या घराघरात पोहोचण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात देखील ओबीसी समाजाच्या बैठका होत आहे. ओबीसी समाजाने घरावर संकट आले आहे, असे समजून मेळावा यशस्वी होण्यासाठी समोर या, असे आवाहन डॉ. नागेश गवळी यांनी केले आहे.

अॅड. अभय आगरकर, अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, संजय गारुडकर, बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, नंदू एकाडे, सुभाष लोंढे (सुपा), बाळासाहेब भुजबळ, माऊली गायकवाड, बाळासाहेब भुजबळ, अनुरीता झगडे, छाया नवले हे नगरमधील ओबीसी नेते मेळाव्याचे नियोजन करत आहे.

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना राज्य सरकारमधून हाकला, अशी मागणी सरकारमधील काही मित्रपक्षांच्या आमदारांकडून होत आहे. यावर ओबीसी समाज आणि नेते आक्रमक होताना दिसत आहे. नगरमधील एल्गार मेळाव्यातून उत्तर द्यायचे, असे नियोजन नगरमधील ओबीसी नेते करत आहेत.

मेळाव्यास्थळी पोलिस बंदोबस्तासह शेकडो ओबीसी स्वयंसेवक असतील. महिला स्वयंसेवक देखील असतील. नगर शहरासह जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या घराघरात पोहोचण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात देखील ओबीसी समाजाच्या बैठका होत आहे. ओबीसी समाजाने घरावर संकट आले आहे, असे समजून मेळावा यशस्वी होण्यासाठी समोर या, असे आवाहन डॉ. नागेश गवळी यांनी केले आहे.

अॅड. अभय आगरकर, अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, संजय गारुडकर, बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, दत्ता गाडळकर, नंदू एकाडे, सुभाष लोंढे (सुपा), बाळासाहेब भुजबळ, माऊली गायकवाड, बाळासाहेब भुजबळ, अनुरीता झगडे, छाया नवले हे नगरमधील ओबीसी नेते मेळाव्याचे नियोजन करत आहे.

या एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार राम शिंदे, कल्याणराव दळे, माजी आमदार नारायण मुंडे, पी.टी.चव्हाण, बबनराव तायवाडे, शब्बीर अन्सारी, लक्ष्मण गायकवाड, दौलतराव शितोळे आदी ओबीसी नेते पस्थित राहणार आहेत.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT