Onion Crisis in Parliament, Congress Protests in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Protest: कांदा प्रश्न संसदेत गाजला, आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा नाशिकमध्ये महामोर्चा

Balasaheb Thorat Protest Nashik Onion Issue: नाफेडच्या कांदा खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचा आज नाशिकमध्ये महामोर्चा

Sampat Devgire

Congress Mahamorcha Nashik Farmer Protest: कांदा प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकरी संताप्त आहेत. कांदा दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने कांदा उत्पादकांपुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. याबाबत केंद्र आणि राज्यातील सरकार उदासीन असल्याचा आरोप होत आहे.

इंडिया आघाडीच्या खासदारांनी कांदा उत्पादकाच्या प्रश्नावर संसदेच्या आवारात मंगळवारी प्रखर आंदोलन केले. महाराष्ट्राचा आणि विशेषता नाशिकचा प्रश्न असला तरी या निमित्ताने देशभरातील खासदारांनी या मागणीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी झाली.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि उत्पादकांना मदत करावी या मागणीसाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांसह विविध खासदारांनी पाठपुरावा केला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पणन मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री तसेच अन्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र केंद्र सरकार उदासीन आहे.

केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली. कांद्याचे दर ७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. निर्यातदारांना बंधने घातल्याने निर्यातीत अडथळे आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा दुर्लक्षित झाल्याचे गंभीर चित्र आहे. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

या पार्श्वभूमीवर कांदा पिकाला किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा. नाफेड कडून झालेल्या खरेदीतील भ्रष्टाचार आणि दलाली याची गंभीर चौकशी करून कारवाई करावी. यामध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. कांदा उत्पादकांची आणि ग्राहकांची गळचेपी करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील कांदा बटाटा भवन येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. काल या प्रश्नावर संसदेच्या आवारात देशभरातील खासदारांनी आवाज उठवला होता. नाशिकच्या मोर्चात खासदार डॉ बच्छाव, राजाराम पानगव्हाणे शिरीष कोतवाल आकाश छाजेड यांसह विविध नेते सहभागी होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT