AIMIM Dhule mass resignation : 'AIMIM'ला मोठा धक्का; धुळे कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा...

Dhule AIMIM Executive Committee Resigns Alleging Neglect by Party Leadership : धुळे जिल्ह्यातील 'AIMIM' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
AIMIM Dhule mass resignation
AIMIM Dhule mass resignationSarkarnama
Published on
Updated on

Dhule AIMIM resignation : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेत महाराष्ट्रात राजकीय बॅकफूटला गेलेला 'AIMIM' पक्षाला धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत.

धुळे जिल्ह्यातील शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार फारुक शाह यांनी पक्ष सोडला होता. आता जिल्हा कार्यकारिणीनं सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांनी एकदम राजीनाम्याची भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे.

'AIMIM' पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने एक सोबतच पक्षाचा राजीनामा दिला. धुळे शहर कार्यकारिणीने सामूहिक राजीनामा दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. 'AIMIM' पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

'AIMIM'चे धुळे (Dhule) शहर जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राजीनामा देण्यामध्ये समावेश आहे. राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींच्या दुर्लक्षपणावर खापर फोडलं आहे.

AIMIM Dhule mass resignation
Manoj Jarange Jalna : 'परिणय फुके पावसाळ्यातील बेडूक, फडणवीसांनी शेपूट धरल्यावर भुंकतो'; मनोज जरांगेंची जहरी टीका

​पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागे ताकद उभे करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याला कंटाळून हा निर्णय घेतल्याचं राजीनामा पत्रात नमूद केलं आहे. पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून ताकद मिळत नसल्याने, लोकांच्या समस्यांवर काम करताना मर्यादा येतात. परिणामी स्थानिकांमध्ये पक्षश्रेष्ठींबाबत नाराजी आहे.

AIMIM Dhule mass resignation
Sunil Kedar complaint : सुनील केदारांना आता काँग्रेसमधूनच 'फटाके'; सपकाळांकडे तक्रार...

सर्व नाराज पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामा जिल्हाध्यक्ष नासीर पठाण यांच्याकडे सादर केले आहेत. या राजकीय घडामोडीमुळे धुळ्यात 'AIMIM'ला धक्का बसला आहे. धुळे शहर कार्यकारिणीच्या राजीनाम्यापूर्वी गेल्या महिन्यात माजी आमदार फारुक शाह यांनी पक्ष सोडला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारुक शाह यांनी प्रवेश केला आहे. फारुक शाह हे मागील निवडणुकीत भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याविरोधात लढले होते आणि दुसऱ्या क्रमांकाची लक्षवेधी मते घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com