Onion farmers politics: काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी चांदवड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्याने राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. त्यात निर्यातबंदीच्या आडून झालेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आहे.
इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी चांदवड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी जिल्हाभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हेदेखील सहभागी होतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सभेच्या पूर्वसंध्येला चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्रात कांदा निर्यातबंदीच्या आडून केंद्र शासनाच्या यंत्रणा आणि स्थानिक नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचा दावा केला जात आहे. या पत्रामध्ये केंद्र शासनाने केलेले नियम व त्या आडून केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रमाण मांडले आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली असून, राहुल गांधी(Rahul Gandhi) या पत्राची काय व कशी दखल घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नाफेड आणि गुजरातच्या एनसीसीएफ या कंपनीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून कोणताही कांदा खरेदी केलेला नाही. त्यांनी काय दराने कांदा खरेदी करावा हे अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला समजलेले नाही. या कंपन्यांनी व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी केला तो दिल्लीला पाठवला आणि त्यातून बक्कळ कमाई केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले, त्यातील 90 टक्के शेतकरी बनावट आहेत.
तसेच ज्यांच्या नावावर पैसे जमा झाले, त्यांच्याकडून ते परत घेण्यात आले, असा दावाही करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय यंत्रणांना माहिती दिल्यानंतरदेखील काहीही कारवाई झाली नाही. या दोन्ही संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात कांदा निर्यातबंदी होऊ नये, यासाठी संसदेत नवीन कायदा करण्यात यावा. कांद्याचे दर महाग झाल्यास हा कांदा रेशन दुकानावर शासनाने शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगू द्यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaaprkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.