Farmers participate in the massive Onion Farmers’ March at Chandwad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Onion Farmers’ March : चांदवडच्या कांदा आंदोलनाचा बाण महायुतीला घायाळ करण्यात यशस्वी?

Chandwad Onion Farmers’ March Protest : चांदवड येथील मोर्चाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पंधराशे 80 रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना आता आंदोलन फसते की काय? असे वाटले. मात्र या घोषणेतील हवाच मोर्चाने काढून घेतली. सरकारने नाफेड मार्फत बाजार हस्तक्षेप करून खरेदीचीची घोषणा केली.

Sampat Devgire

Onion Farmers' March: राज्यात आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये सध्या विधान परिषदेची उमेदवारी कोणाला याचीच चर्चा आहे. यामध्ये शेतमालाला भाव नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा गायब होता. चांदवड येथील मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादाने त्याला उजाळा मिळाला.

कांदा उत्पादक शेतकरी हा नेहमीच राजकीय दृष्ट्या गंभीर प्रश्न राहिला आहे. सध्या निर्यात बंदीसह अनेक कारणाने कांद्याचे भाव गडगडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला हादरा देण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी चांदवड येथे महाविकास आघाडीने कांदा प्रश्नावर आंदोलन केले. त्याला विरोधी पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी हजेरी लावली.

खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे यांनी कांदा प्रश्नावर गेली काही दिवस आवाज उठवला होता. त्याची परिणीती चांदवड येथील महामार्ग रोखण्यात झाली. चांदवड येथील मोर्चाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पंधराशे 80 रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा केली. त्यामुळे अनेकांना आता आंदोलन फसते की काय? असे वाटले. मात्र या घोषणेतील हवाच मोर्चाने काढून घेतली. सरकारने नाफेड मार्फत बाजार हस्तक्षेप करून खरेदीचीची घोषणा केली.

मात्र प्रत्यक्षात हा भाव जास्तीत जास्त दर्जाच्या दोन लाख टन कांद्याला मिळू शकेल. कांद्याचे एकूण उत्पादन 170 लाख टन आहे. 99 टक्के कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राच्या घोषणेचा लाभ होणार नाही, असा दावा खासदार भगरे यांनी केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या नेत्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सोबत शेतकरी संघटना ही होतीच.

सत्ताधारी आमदार निरुत्तर

जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार सध्या महायुतीच्या सत्ताधारी पक्षात आहे. "विकास" या गोंडस नावाची राजकीय ढाल करून या आमदारांनी पक्षांतर केले. आज शेतकरी संकटात असताना यातील सर्वच अदृश्य झालेले दिसले. चांदवडला आंदोलन झाले तेथील सत्ताधारी आमदार कांद्याला भाव नसताना कुठेच दिसले नाही.

सर्वाधिक झळ नांदगाव येवला आणि मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसते. तेथे दोन मंत्री आहेत. या मंत्र्यांचा शेतकऱ्यांना काय उपयोग झाला? अशी चर्चा आंदोलकांमध्ये होती. त्या दृष्टीने चांदवड येथे शक्ती प्रदर्शन करून विरोधक महायुती सरकारला घायाळ करण्यात यशस्वी झाले असे चित्र दिसले. कारण या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांपासून तर भाजपची सगळीच टीम आंदोलन आणि काँग्रेस नेत्यांवर तुटून पडलेली दिसली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT