

Aimim News : उच्च न्यायालयात महापालिकेने मतीन पटेल यांचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी सात दिवस थांबण्याची तयारी दर्शवली होती. मग चोवीस तासात, भल्या पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची घाई का केलीत? असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला. अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर इम्तियाज यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली.
'आमच्या नगरसेवकाच्या अतिक्रमण काढण्यासाठी जी तत्परता प्रशासनाने दाखवली, तशीच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे अतिक्रमण काढण्यासाठी कधी दाखवणार'? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी आयुक्तांना विचारला. यावर सगळ्यांवर कारवाई होईल, असे सांगत आयुक्तांनी या शिष्टमंडळाची बोळवण केली. महापालिकेने दिलेलाच डाटा आम्ही आयुक्तांना आठवण म्हणून दिला आहे. यात शहरातील अनेक नगरसेवकांच्या अनाधिकृत बांधकाम, अतिक्रमणाची माहिती असल्याचे इम्तियाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर छत्रपती संभाजीनग महापालिकेने बुलडोझर चालवला. त्यानंतर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel ) यांनी महापालिका आयुक्तांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.
एवढ्या तक्रारी करूनही सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या कथित अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही? आमच्या नगरसेवकांच्या घर आणि कार्यालयावर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या मालमत्तांवरही व्हायला हवी.
अनेक महिन्यांपासून संबंधित तक्रारी आणि अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मतीन पटेल यांचे बांधकाम अनधिकृत असल्यास कारवाईबद्दल आम्हाला आक्षेप नाही. मात्र इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार, यावर आमचे लक्ष आहे. संबंधित पुरावे महापालिकेला देण्यात आले असून आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.