Angri Farmers with Dr. Bharti Pawar
Angri Farmers with Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; कांद्याची धग भाजपला, राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना घेराव

Sampat Devgire

नाशिक : कांद्याची धग भाजपच्या सरकारलाही बसु लागली आहे. (Nashik) कांदा दरवाढीनंतर रात्रीच निर्यातबंदी (Export banned) करून परदेशातून कांदा (Onion) मागवणारे सरकार तीन महिन्यांपासून कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत असताना ठोस उपाययोजना करत नाहीत, असा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) करत शिरसगाव (ता. निफाड) येथे केंद्रीय (Centre) राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांना घेराव घालत जाब विचारला. (Aggressive farmers questioned centre minister Dr. Nharti Pawar)

या वेळी कांदा उत्पादक आणि मंत्री पवार यांच्यात खडाजंगी झाली. येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने कांद्याला पंधराशे रुपये अनुदान जाहीर करावे, वाढीव निर्यातीसाठी केंद्राने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसे न घडल्यास विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला.

कांदा भावप्रश्‍नी याआधी जाहीर केल्याप्रमाणे नगरसूल येथील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्यातर्फे होळीचे औचित्य साधत कांद्याची होळी करण्यात येणार आहे, त्यासाठी त्यांनी कांद्याच्या पिकात मक्याचे ताटे अंथरले असून, सोमवारी सरकारचा निषेध करीत कांदा पीक जाळण्यात येणार आहे. यामुळे कांदादराचा प्रश्‍न पेटत चालला असून, संतापलेला शेतकरी सरकारच्या विरोधात उभा राहत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.

निर्यात वाढली, मग भाव का नाही?

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून, सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात, मग शेतीमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

या वेळी शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर मंत्री पवार यांना काढता पाय घ्यावा लागला. रविवारी निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मंत्री पवार आल्या होत्या.

त्या वेळी कांदा दरावरून त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाफेड काहीच कामाचे नसल्याचे सांगताच केंद्रीय मंत्र्यांचा संताप अनावर झाला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे, आम्ही नाफेडची खरेदी बंद करू. मागणी नसल्याने शेतीमालास भाव नसल्याचे मंत्री डॉ. पवार यांनी सांगताच शेतकरी अजूनच आक्रमक झाले.

शेती तोट्यात असल्याने आमच्या मुलांचे लग्न होत नाही. याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यतीन कदम यांनी शेतकऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. तरीही काही शेतकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर केंद्रीय मंत्र्यांना काढता पाय घ्यावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT