Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate On NDCC Bank issue : जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येणे हीच आजची गरज!

Only MSC Bank can save NDCC bank through cash capital-राज्य शासनाच्या वित्त विभागाने स्वतंत्र जीआर काढून जिल्हा परिषद, पं.स. योजना व शिक्षकांचा निधी बँकेकडे वर्ग करावा.

Sampat Devgire

Nashik Cooperative Politics news : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मूळ समस्या आर्थिक आहे. आजच्या घडीला बँकेकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांना मदत करायची तर आर्थिक क्षमता हवी. त्यासाठी केवळ राज्य सहकारी बँकच हा प्रश्न सोडवू शकते. राज्य सरकारने त्याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. (MLA Manikrao Kokate deemands state government intervention in NDCC bank for financial aid)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणींबाबत मंत्रालयात (Mumbai) बैठक झाली. या वेळी आमदार कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपली भूमिका मांडली.

यासंदर्भात आमदार कोकाटे म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेबाबत मी अतिशय आग्रहाने हा प्रश्न मांडला. जिल्हा बँकेच्या सर्व स्थितीची जाणीव त्यांना करून दिली. यामध्ये राज्य सरकार बँकेला पैसे उपलब्ध करून देऊ शकत नाही. बँक फक्त हमी घेऊ शकते. याबाबत अतिशय जोरकसपणे ही भूमिका मांडल्याने शासन पॉझिटिव्ह झाले.

ते म्हणाले, बँकेच्या आजच्या स्थितीला जबाबदार कोण? यावर फार काथ्याकूट न करता, बँकेला चांगल्या स्थितीत कसे आणायचे यावरच फोकस करावा लागले. बँक बुडविण्यास काही पार्ट संचालक मंडळाचा असू शकतो, हे मी नाकारणार नाही. मात्र, बँकेने अनावश्यक कर्ज वाटली आहेत. ती कर्ज वसूल होत नाही, त्यामुळे आजची अडचण आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक यांसह शासकीय योजनेतील ज्या ठेवी होत्या, त्या ठेवी काढून घेतल्याबाबत आमदार कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात ते म्हणाले, दरवर्षी सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटींच्या ठेवी असतात. हे पाचशे कोटी आले, तरी बँक एका दिवसात बऱ्या स्थितीत येऊ शकेल.

बँकेला उलाढाल म्हणून पैशांची गरज असते. हे भांडवलदेखील राज्य सरकारने काढून घेतले. वित्त विभागाने जर स्वतंत्र जीआर काढून ते पैसे पुन्हा बँकेकडे वर्ग केले तर मोठी मदत होऊ शकेल. त्यातून सध्या जी नऊशे कोटींची गरज आहे, ती निम्म्यावर येईल. उर्वरित निधी राज्य शासनाने द्यावा. अशा प्रकारे बँक अडचणीतून बाहेर येऊ शकेल.

जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येण्याचा खूप मोठा फायदा आहे. जिल्ह्यातील पाच ते सात लाख लोकांना त्यापासून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ आहे. ठेवीदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शिक्षक, सचिव, सोसायट्या, शेतकरी, बँकेचा स्टाफ, पतसंस्था, अनेक कारागीर संस्था आहेत. त्या संस्थांचे भवितव्य जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत आल्यास उंचावेल, असे आमदार कोकाटे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT