Pankja Munde, BJP leader
Pankja Munde, BJP leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा टोमणा; कार्यक्रमात फक्त पंतप्रधान आणि मुंडे यांचाच फोटो शोभतो!

Sampat Devgire

नाशिक : दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी मोठ्या कष्टाने महाराष्ट्रात भाजप पक्ष उभा केला. म्हणून सभा- समारंभात केवळ दिवगंत गोपीनाथ मुंडे व पंतप्रधानांचेच फोटो शोभतात, असे अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांचे नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी टोमणा मारला.

त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी १४ किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षण घेतले. परिस्थिती नसल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना हात देऊन भारतीय जनता पक्ष कार्यालय गाठले. फिर फिरले व मोठ्या कष्टाने हा पक्ष त्यांनी महाराष्ट्रात उभा केला.

येथील लोकनेते (कै.) गोपीनाथ मुंडे साहेब अभ्यासिका व श्री स्वामी समर्थनगरमधील सूर्यमुखी हनुमान मंदिर सभामंडप लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नाशिकच्या बससेवेचे खूप नाव घेतले जात आहे. त्यामुळे मंगळवारी येथील बस प्रवासाचा आनंद घेणार आहे. सध्या मी आमदार नाही. त्यामुळे मला बस प्रवास फ्री नाही, म्हणून मी तिकीट काढून प्रवास करणार असल्याचे त्या मिश्कीलपणे म्हटल्या.

नाशिकचा विकास बघून छान वाटले. नाशिक म्हणजे माझे माहेर आहे, असे सांगून मुंडे साहेबांचे नशिकवर खूप प्रेम होत. साहेबांच्या नावाला शोभेल, असे काम करा. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल म्हणाले, की हे वसुली सरकार आहे. राज्य सरकार नाशिमहापालिकेचा निधी अडवून ठेवत आहे. टप्प्याटप्प्याने शिवसेनेचे पदाधिकारी भाजपत येणार आहेत. नियो मेट्रो मंजूर झाली आहे. लवकरच टेंडर निघणार आहे. द्वारकेला तीन मजली उड्डाणपूल होणार आहे. समृद्धी महामार्गही लवकर होणार आहे. आयटी हब साकारणार आहे. कोरोना काळात महापालिकेने २०,००० रेमडेसिव्हर इंजेक्शनची व्यवस्था केली. पाणी योजना साकारली. हवाई मार्ग जोडले. नवी दिल्ली व नवीन मुंबईनंतर नवीन नाशिकचा विकास होणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, रोहिणी नायडू, जगन पाटील, नगरसेविका कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, छाया देवांग, गोविंद घुगे, महेश हिरे, वैभव महाले, राकेश ढोमसे, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT