Operation Sindoor Celebration at Ramkund Nashik: पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संताप होता. भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यात पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. त्याचे देशभर पडसाद उमटले आहेत.
पाक व्यक्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ नष्ट झाले. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्याचे देशभर स्वागत होत आहे. या कारवाईत महिलांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे या आनंदोत्सवाला ती देखील एक सोनेरी किनार होती.
पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला पोसत आला आहे. त्याला धडा शिकवावा ही प्रत्येक भारतीयांची मनापासून इच्छा होती. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी त्यासाठी एकत्र येत ही मोहीम राबवत पाकिस्तानचे नाक खेचले आहे. यासाठी पंतप्रधान तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. या कारवाईने देशवासीयांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागवला आहे, असे यावेळी महिलांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर बुधवारी गोदावरी नदीच्या तीरावर रामकुंडात रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये गंगा गोदावरी मातेचे ललिता सहस्त्रनामाने कुंकू लावत पूजन करण्यात आले. गोदासेवकांनी आपल्या भावपूर्ण स्वरांनी सहस्त्रनामाचे पठण केले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
भारतीय सैन्याच्या जवानांना बळ मिळावे यासाठी महिलांनी प्रार्थना केली. या पूजनानंतर पूजेसाठी वापरण्यात आलेला सिंदूर सर्व उपस्थित महिलांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला रामकुंडावर महिलांची मोठी गर्दी झाली होती.
देशासाठी शौर्याने लढणाऱ्या सैन्य दलांचे अभिनंदन करण्यात आले. साठी शौर्य संयम आणि बलिदानाची परंपरा जपणाऱ्या जवानांना ही एक लहानशी मात्र हृदयस्पर्शी शुभेच्छा असल्याचे, यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या नंदिनी देवरुखकर, सायली चव्हाण, अमृता चव्हाण, ऐश्वर्या ठाकरे, माधवी पारख, इशिता खोंड, अद्विक सी., वैष्णवी जोशी, सहाना माताजी, वेदिका अंभोरे यांसह विविध महिला आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी शेकडोच्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.