Sinhsth Kumbh Mela: देवाभाऊंनी महापालिकेचे कापले पंख?, कुंभमेळ्यासाठी आता स्वतंत्र प्राधिकरण!

Devendra Fadnavis; Chief Minister cuts the wings of the Municipal Corporation during the development festival of Kumbh Mela-सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात तसेच विकासकामांत आता येणार सुसूत्रता आणि शिस्त.
Pravin Gedam & Devendra Fadanvis
Pravin Gedam & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela News: नाशिकला येत्या २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यात अनेक गोष्टी नव्या होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोंढी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय कुंभमेळ्याच्या आयोोजनात महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्यात मान्यता दिली आहे. या प्राधिकरणाचे मूलभूत नियोजन आणि कार्यपद्धती विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी निश्चित केली आहे. विस्कळीत होणाऱ्या कुंभमेळ्यात सुसूत्रता येईल

Pravin Gedam & Devendra Fadanvis
Eknath Shinde Politics: शिवसेना शिंदे पक्ष साशंक; पावसाळ्यात महापालिकेच्या निवडणुका कोणती यंत्रणा घेणार?

यापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात मंत्री महाजन यांनी काही मूलभूत घोषणा केल्या होत्या. मात्र त्या घोषणा कागदावरही आल्या नव्हत्या. कुंभमेळ्याच्या कामकाज आणि नियोजनाबाबत साधू आणि धार्मिक संस्थांच्या मोठ्या तक्रारी होत्या.

Pravin Gedam & Devendra Fadanvis
Operation sindoor: छगन भुजबळ यांची सुचक प्रतिक्रीया, ... मात्र आपल्याला तयार रहावे लागेल!

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. कुंभमेळा प्राधिकरण सिंहस्थ कामकाजाचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करेल. यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागासारख्या तांत्रिक कौशल्य असलेल्या संस्थांकडून संस्थाची कामे करून घेतली जातील.

नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा सातत्याने नियोजन, आयोजन, व्यवस्थापन आणि व्यवस्था म्हणून बदलता राहिला आहे. यंदाचा कुंभमेळा हा प्रामुख्याने एक राजकीय इव्हेंट होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी मुख्य वाटा असलेल्या महापालिकेचे पंख कापले असे म्हणता येईल.

नाशिकला २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दन हजार ३४५ कोटी रुपयांचा विकास आराखडा होता. यातील विविध कामांसाठी १०७५ कोटी रुपये महापालिकेने वाटा उचलला होता. महापालिका करीत असलेल्या बहुतांशी कामांमध्ये तत्पुरत्या सुविधा आणि सोयींवर मोठा खर्च होतो. हा खर्च नेहमीच वादाचा आणि संशयाचा विषय ठरला आहे.

यापूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सध्याचे प्राधिकरण अधिकारी असलेले प्रवीण गेडाम महापालिकेचे आयुक्त होते. हा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. मध्ये सर्वाधिक कळीचा आणि नेमकेपणाने प्रशासनाला दिशा दाखविणारा प्रशासकीय अहवाल महत्त्वाचा असतो. माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी त्याची प्रथा सुरू केली होती. त्यामुळे यंदाचे प्राधिकरण प्रशासकीय अहवालातील सूचनांचा परिपाक असू शकतो.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com