Operation Sindoor News: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान हल्ले आणि उत्तर सुरूच आहे. देशभर सावधगिरी चा इशारा देण्यात आला आहे. लष्कर दक्षतेने सीमेवर आणि युद्धाच्या मैदानात पाय रोवून आहे.
ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या पार्श्वभूमीवर लष्करातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहे. त्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकसह परिसरातील असंख्य जवान सुट्टी अर्धवट सोडून लष्करी सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.
नंदीचे खेडगाव (ता. पाचोरा) जळगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हे लष्करात कार्यरत आहेत. ते सुट्टीवर गावी आले होते. याच दरम्यान त्यांचा विवाह निश्चित झाला होता. त्यामुळे सबंध कुटुंब विवाहाच्या तयारीत आणि आनंदात व्यस्त होते.
नुकतेच ५ मेस लष्करी जवान ज्ञानेश्वर पाटील यांचे नजीकच्याच यामिनी या तरुणीशी विवाह झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंब कुलाचार आणि धार्मिक विधीत व्यस्त होते. त्यातच पाटील यांना लष्करांकडून सुट्टी रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले. त्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.
हे आदेश मिळाल्यानंतर लग्नाच्या भोवल्यावरून मनोज पाटील थेट आपल्या लष्कराच्या सेवेत रुजू होण्यासाठी रवाना झाली. त्यांच्या विवाहाला एकच दिवस झाला होता. त्यामुळे विवाहिता यामिनी काहीशी नाराज होती. मात्र कर्तव्य पुढे कौटुंबिक विषय दुय्यम ठरत असतात.
लष्करी जवान मनोज पाटील हे लग्नाच्या बोल्यावरून थेट आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी रवाना झाले. त्यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी विवाहिता यामिनी यांसह कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. त्यांनी मनोज पाटील यांना अतिशय उत्साहाने निरोप देत शुभेच्छा दिल्या. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे परिसरात मनोज पाटील यांचा विवाह आणि लगेचच अंगावरची हळद ओली असतानाच सेवेत हजर होण्यासाठी रवाना होणे हा चर्चेचा विषय ठरला.
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर देशभरात अलर्ट आहे. या कारवाईनंतर पाकिस्ताननेही भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्व लष्करी जवानांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरातील पोलिसांनाही रजा रद्द करून कामावर हजर होण्याच्या सूचना आहेत. शासकीय आणि निमशासकीय विभाग देखील सक्रिय असून अनेक कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द झाल्याने ते कामावर कार्यरत झाले आहेत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.