Chhagan Bhujbal Politics: सुप्रिया सुळे अन् अजितदादांच्या मनोमिलनासाठी भुजबळांचा मोठा निर्णय; त्या भूमिकेची तयारी....

Chhagan Bhujbal; Both NCP should come together, Chhagan Bhujbal is ready to take the initiative -ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात, असे विधान केले होते.
Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात नवा धक्का दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्र यावेत ही त्यांची इच्छा आहे. याबाबत अनेकांनी व्यक्तिशः इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता या प्रक्रियेपासून आपण अलिप्त असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Malegaon Blast Case: वादग्रस्त साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर शिक्षेची टांगती तलवार कायमच, मालेगाव स्फोट सुनावणी पुन्हा लांबणीवर!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि अनेक नेत्यांनी त्याचे स्वागत केले आहे. अनेकांसाठी हा धक्का देखील मानलं जातं. पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.

Sharad Pawar, Chhagan Bhujbal & Ajit Pawar
Uddhav Thackeray-Raj Thackeray comes together: 'आता तरी एकत्र या' ; उद्धव आणि राज ठाकरेंना महाराष्ट्र सैनिकांचे आवाहन

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ या संदर्भात म्हणाले, यापूर्वीच म्हटलो आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया होऊ शकते. मग दोन्ही पवार एकत्र का येऊ शकत नाही? महाराष्ट्राच्या राजकारणात ही कुटुंब काही कारणांमुळे दुरावली आहेत. ती एकत्र येण्याची प्रक्रिया होऊ शकते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात त्याचा वेगळा प्रभाव पडेल. पक्षांची शक्ती निश्चितच वाढेल. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे. तो सगळ्यांनाच स्वागतार्ह असेल यात शंका नाही. गरज पडल्यास किंवा आवश्यकता असल्यास त्यासाठी मी पुढाकार देखील घेण्यास तयार आहे, असे भुजबळ म्हणाले.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष एकत्र आले तर, मी त्याचे स्वागतच करीन. हे दोघेही एकाच घरात वाढलेले आहेत. अजित पवार यांनी याबाबत अनेकदा मतप्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज आहे, असे मला वाटत नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी याबाबत विधान केले होते. त्याचे पडसाद देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातही उमटलेले दिसतात. या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रक्रियेचे त्यांनी स्वागत केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला राजकीय दुरावा कमी होण्याची ही प्रक्रिया तर नाही ना? असे बोलले जाते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com