Eknath Shinde, Uddhav Thackeray  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Operation Tiger : ते 7 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात? जाणून घ्या त्या मागची 5 कारणं

Operation Tiger, Uddhav Thackeray : उद्दव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरची धास्ती घेतल्याचं दिसत आहे. ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही या ऑपरेशनला दुजोरा दिला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. हे ऑपरेशन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील ७ खासदारांच्या संदर्भातील आहे. हे ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे.

इतके दिवस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या जात होत्या. मात्र, आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या चर्चेला दुजोरा दिला आहे. काही लोक संपर्कात आहेत, तर काही उघड उघड बोलत आहेत. आम्हाला सर्व माहित असून आता हे अधिकृत मान्य करायला हवं असे म्हणत एकप्रकारे ऑपरेशन टायगर बाबत कबुलीच अंबादास दानवे यांनी दिली आहे.

त्यामुळे आता ठाकरेंनी या ऑपरेशनची धास्ती घेतल्याचे दिसत आहे. कारण शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (दि. १४) जूनला आपल्या 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना या बैठकीचा निरोप पाठवण्यात आला असून मुंबईत उपस्थितीत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते आहे.

दरम्यान, कथित ७ खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात? यामागची ५ कारणे जाणून घेऊ..

१. निधी मिळवण्यासाठी अडचण…

विरोधी बाकावर असल्याने या सर्व खासदारांना प्रामुख्याने निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत. निधी मिळवण्यासाठी नाराज खासदार सत्तेकडे आकर्षित होऊ शकतात.

२.भविष्याची चिंता…

राज्यात संपूर्ण ५ वर्ष महायुतीचच मजबूत सरकार कायम राहणार असं तरी सध्या दिसत आहे. त्यामुळे अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता आहे. सत्ताधारी पक्षात गेल्यास भविष्याची चिंता दूर होईल.

३. दोन्ही सरकारचा फायदा

केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. सरकार महायुतीचं असल्याने केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारचा फायदा निधी मिळवण्यासह अन्य बाबतीत करुन घेता येईल.

४. पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण ठरला

पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण ठरला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरील कायदेशीर वादापेक्षा मतदारांचा कौल आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता व सत्ता हे घटक अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. पक्षफुटीनंतरही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं देखील.

५. विकास कामांना गती

केंद्रात भाजपची सत्ता असल्याने निधी मिळेल. त्यातून विकास कामांना गती मिळण्यास मदत होईल. त्यातून मतदारसंघातील विकासकामे होतील. लोकांची नाराजी दूर करता येईल. त्यातूनच पुढील राजकीय करिअर सेफ होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT