UBT Shivsena : मराठवाड्यातील आणखी एक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा, 'त्या' बैठकीला दांडी!

Operation Tiger News : राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे 9 पैकी 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून ठाकरे सेनेचे निवडून आलेल्या 9 पैकी 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. बुधवारी एकनाथ शिंदे एनडीएच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत होते. यावेळी काही खासदारांनी शिंदे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच धाराशिवमध्ये आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला धाराशिवचे खासदार गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता धाराशिवमध्ये आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वाच्या बैठकीला खासदार ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Uddhav Thackeray
Shivsena UBT : पक्षाशी प्रामाणिक तरी आमच्या नेत्यावर अविश्वास का? खासदार संजय जाधव समर्थक शिवसैनिक एकवटले!

जून 2022 मध्ये शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी देखील अनेक नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच शुक्रवारी धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र ओम राजेनिंबाळकर अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Uddhav Thackeray
Operation Tiger : शिंदे शिवसेनेच्या नाशिकमधील कार्यक्रमाला ठाकरेंचे खासदार जाऊन बसले; निव्वळ योगायोग की 'ऑपरेशन टायगर'चे संकेत?

खासदार ओम राजेनिंबाळकर बैठकीला गैरहजर का? असा सवाल पत्रकारांनी अंबादास दानवे यांना विचारला असता ते म्हणाले, काही कामानिमित्त ते बैठकीला आले नसतील, त्यांच्याच कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असे प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Operation Tiger Returns? : 'ऑपरेशन टायगर'चं मला काहीच माहिती नाही; शिंदे भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, वाढवलं राजकीय टेन्शन

धाराशिवाचे खासदार ओम राजेनिंबाळकर हे 2019 साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विजय मिळवला होता. त्यानंतरच आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Uddhav Thackeray
Shivsena News : उद्धव ठाकरेंना 'होम ग्राउंड'वरच धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com