Bhaskar Bhagare and Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tapovan Tree Cutting : नाशिकच्या दोन्ही विरोधी खासदारांचे कुणी ऐकेल का? तपोवनातील वृक्षतोड थांबवण्यासाठी दिल्लीच्या दरबारात खटपट

Bhaskar Bhagare and Rajabhau Waje : खासदार भगरे व खासदार वाजे दोघेही विरोधी पक्षातील आहेत. त्यामुळे जिथे भाजपच्या आमदारांचे काही चालत नाही तेथे विरोधी पक्षातील खासदारांचे काय चालणार हा प्रश्नच आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकच्या तपोवनतील वृक्षतोडीचा विषय दिवसेंदिवस अजून तीव्र होत चालला आहे. येथील वृक्षप्रेमींच्या बाजुने जनाधार वाढत चालला आहे. नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे या दोघांनीही आता याप्रकरणात उडी घेतली आहे.

बुधवारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी तपोवनात जाऊन वृक्षप्रेमींची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ आज खासदार भास्कर भगरे यांनी देखील या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय वन मंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. झाडे तोडण्याच्या विरोधात वन मंत्र्यांना मध्यस्थी करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी फार आधीच मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना पत्र व्यवहार करून स्वतः यात लक्ष घालण्याबाबत विनंती केली होती. आता त्यांनी दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून याप्रसंगी थेट संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगितलं आहे.

तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील जागा मोकळी करण्यासाठी तब्बल १८०० हुन अधिक झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याची बाब समोर आल्यानंतरच याबाबत नाशिककरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्यातच याच परिसरात एक्सिबिशन सेंटर उभारणी करता निविदा निघाल्याची बाब उघड झाल्याने वृक्ष वाचवण्याच्या लढ्याला अजूनच तीव्रता प्राप्त झाली. यासंदर्भात विरोधी पक्षातल्या दोन्ही खासदारांनी आता दिल्लीदरबारी खटपट सुरु केली आहे.

भाजपच्या आमदारांचे काही चालेना.. खासदारांचे काय चालणार

अद्याप सत्तेत असलेल्या नाशिकच्या तिन्ही भाजप आमदारांनी या वृक्षतोडीविरोधात साधा विरोधाचा 'वि' सुद्धा काढलेला नाही. मुळात कुंभमेळामंत्री महाजनांपुढे त्यांचेही कधी धकले नाही. त्यामुळे महाजनांपुढे भाजपच्याच आमदारांचे काही चालेना तेव्हा विरोधी पक्षातील या दोन्ही खासदारांचे कोण ऐकेल? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पत्र पाठवणे, निवेदन देणे यापलीकडे तेही काही करु शकत नाही. कुंभमेळा नियोजनातही सुरुवातील दोन्ही खासदारांना लांब ठेवण्यात आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT