

Nashik News : नाशिक तपोवन वृक्षतोडवादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची एण्ट्री झाली आहे. वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींच्या सुरु असलेल्या आंदोलनाला त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाय पत्रकारपरिषद घेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहे. तसेच यानंतर अंजली दमानिया तपोवनात भेट देण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामच्या नावाखाली ती जमीन बळकावून पुण्यातील मुंढवा येथील जमीन घोटाळ्याप्रमाणे तिथेही षडयंत्र केले जात आहे. असे मला कळत असून हे षडयंत्र कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच करत आहेत असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पूर्ण समर्थन देत आहेत. नाशिकची जनता तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी लढत आहे. अगदी छोटी छोटी मुले देखील झाडांना कवटाळून उभी आहेत. तरी सुद्धा या लोकांना पैशाची हाव सुटली आहे. नाशिककर हे बिल्कुल खपवून घेणार नाहीत.
नाशिकच नव्हेतर सगळीकडे अशाचप्रकारे जमीनी बळकावल्या जात आहे. जमीनी सपाट करुन त्या बिल्डर आणि राजकारण्यांच्या घशात घातल्या जात आहे. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने नाशिककरांच्या पाठिशी ताकदीने उभे राहायला पाहिजे असे आवाहन दमानिया यांनी केले.
नाशिकच्या तपोवनात कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे. पण यासाठी १८०० झाडे तोडली जाणार असल्याने प्रशासनाच्या या निर्णयाला नाशिककरांनी विरोध केला आहे. आतापर्यंत अभिनेते सयाजी शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत वृक्षतोडीला विरोध केला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यामुळे भाजपची सुद्धा कोंडी झाली आहे. झाडं वाचली तरच पुढची पिढी वाचेल असं म्हणत अजित पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. आता त्यानंतर अंजली दमानिया यांनीही वृक्षतोडीला विरोध केला असून या वादात एण्ट्री घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.