उत्तर महाराष्ट्र

Hindu-Muslim Politics: 'आपला धर्म इतका कमकुवत नाही'; त्र्यंबकेश्वर मंदिरातील 'त्या' घटनेवर राज ठाकरे स्पष्टचं बोलले

Trimbakeshwar Temple News: काही अन्य धर्मियांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थानने केला होता.

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray on Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात जर वर्षांनुवर्षांची परंपरा चालत असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा तिथल्या प्रशासनाचा आणि स्थानिकांचा प्रश्न आहे. देशभरात अशी अनेक मंदिरे, मशिदी आहेत जिथे हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य आढळून येतं. माहिमचा जो दर्ग्याच्या उरुसात जी चादर चढवली जाते, ती माहिम पोलीस स्टेशनचा कॉन्सटेबल ती चादर चढवतो. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा परंपरा चालू ठेवल्या पाहिजे. पण इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून आपला मंदिर आणि धर्म भ्रष्ट होईल, इतका आपला धर्म कमकूवत नाही. अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेवरुन हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी काही अन्य धर्मियांनी नाशिक(Nashik)मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थानने केला होता.  नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं मोठा वादंग निर्माण झाला होता. इतरधर्मीय मंदिरात धूप दाखवण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. मंदिराच्या उत्तर दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश करुन तिथूनच देवाला धूप दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

या घटनेवर राज ठाकरे यांनी सडेतोड भाष्य करत हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला आहे. ''मीही याआधी अनेक दर्ग्यांमध्ये, मशिदींमध्ये गेलो आहे. इतर धर्माचे लोकही आपल्या मंदिरात येतात. उलट आपल्याच काही मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे की काही ठराविक जातीच्याच लोकांनी गाभाऱ्यात प्रवेश दिला जातोय. अशा दृष्टीने जी माणसं बघतात. त्या माणसांची वृत्तीच कोती आहे.'' ( Nashik News)

''त्र्यंबकेश्वर मंदिरात जी पंरपरा वर्षांनुवर्षे चालू आहे तिचा निर्णय तेथील स्थानिक प्रश्नासनाने आणि स्थानिक लोकांनीच घ्यायला पाहिजे, यात बाहेरच्या लोकांनी तिथे जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही. चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणं गरजेचं आहे. पण जाणूनबुजून काही खोदून काढायचं याला काही अर्थ नाही.'' (Raj Thackeray News)

''राज्यात हिंदू खतरे मे हैं, असं लोक म्हणत आहेत, पण ज्या भागात बहुसंख्य हिंदू राहतात, अशा ठिकाणी हिंदू खतरे मे हैं, असं म्हणण योग्य नाही. मला वाटतं, जसजशा निवडणूका जवळ येतील तसतसे हे वाढत जाईल.''

''गेली अनेक वर्षे ते इथे राहत असतात, त्यांची मुलंबाळ, त्यांच्या पिढ्या इथेच राहिल्या आहेत. अशा ज्या ठिकाणी सामंजस्य आहेत, ते इतर लोकांनी बिघडवू नये. जिथे मराठी मुसलमान राहतात अशा भागात दंगली होत नाहीत. महाराष्ट्र पोलिसांना ४८ तास द्या महाराष्ट्रात दंगली घडणार नाहीत. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.''

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT