Cabinet Expansion : दिल्लीवारीनंतर आमदार फडणवीसांच्या भेटीला; राहुल कुल, गोरे नागपूरात दाखल..

Maharashtra Government Cabinet Expansion : आमदारांची मंत्रिपदासाठी लाॅबिंग सुरू?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचा दिल्ली दौरा होता, अशी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र फडणवीस दिल्लीला गेले होते, ही माहिती नागपूरच्या भाजप कार्यालयाकडून नाकारण्यात येते. याबाबत एका मराठी वाहिनीने वृत्त दिले आहे.

Devendra Fadnavis
Narendra Modi Japan Tour : जपानमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण; म्हणाले, 'जगाला शांतीचा..'

फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर आता त्यांच्या निवासस्थानी आमदारांची गाठीभेटी होत आहेत. काही आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानी भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या हालचाली सरकारमध्ये सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

कालच दि. १९ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोलचा दौरा केलेला होता. दिवसभर त्यांनी प्रशाकीय आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं. संध्याकाळच्या सुमारास ते नागपूरातून निघाले होते.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : फडणवीसांचा रात्री गुपचूप दिल्ली दौरा? ; मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर...

सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे, त्यानुसार फडणवीस हे अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जाऊन आले. पुन्हा मध्यरात्री ते नागपूरला परतले. मात्र याबाबतची त्यांच्या नागपूर कार्यालयाकडून याची माहिती नाकारली जात आहे. मात्र यानंतर आमदारांच्या गाठीभेटी वाढल्याने, फडणवीस यांची दिल्लीवारी एकप्रकारे दुजारा मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com