Cyber fraud  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Online Fraud : जिल्हाधिकाऱ्यांच्या अपघाताचा बनाव करुन मागितले पैसे, तलाठ्याची 12 हजारात ऑनलाइन फसवणूक

Talathi online fraud : पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देत पाचोरा तहसील कार्यालयातील तलाठ्याची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देत त्यांच्या उपचारासाठी पैसे आवश्यक असल्याचे सांगून पाचोरा तहसील कार्यालयातील तलाठ्याला १२ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे.

याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फसवणुकीची ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली. पोलिस तपासात रविकांत मधुकर फसाळे (रा. मोरचुंड, ता. मोखाडा, जि. पालघर) याचा हा फोन नंबर असल्याचे समोर आले आहे.

पाचोरा महसूल विभागातील तलाठी अतुल पाटील यांना भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नावाने फोन करण्यात आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पाचोऱ्याजवळ अपघात झाल्याचे सांगितले. तसेच त्यांना पाचोऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देत पाटील यांना तातडीने रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले.

दरम्या, तलाठी अतुल पाटील यांनी ७४९९०५६५२५ या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने आपली ओळख अपघातग्रस्त म्हणून दाखवली आणि उपचारासाठी २० हजार रुपये ऑनलाइन पाठवण्याची विनंती केली. तलाठी पाटील यांनी १२ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्यांनी संबंधितांना पुन्हा फोन केला असता फोन बंद येत होता. त्यामुळे पाटील यांना फसवणूक झाल्याचा संशय आहे.

त्यानंतर पाटील यांनी तत्काळ तहसीलदार शीतल सोलाट यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अपघात झाला नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अधिकाऱ्यांच्या नावाचा आधार घेत मदतीच्या बहाण्याने तलाठी पाटील यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचे या प्रकारातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पाचोरा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT