Nashik Municipal Corporation : कॉंग्रेसच्या खेळीने भाजपवर दबाव, स्वीकृत नगरसेवक निवडीला गती, नावे फायनल करावी लागणार

Swikrut Nagarsevak selection Nashik NMC : न्यायालयीन दबावानंतर स्वीकृत सदस्य निवडीला गती मिळाली आहे. यासंदर्भात आज निर्णायक बैठक होणार आहे. भाजप गटनेत्यांची कसोटी लागणार आहे.
Manisha Khatri, Girish Mahajan,
Manisha Khatri, Girish Mahajan,Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा रखडलेला विषय आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला झालेल्या दिरंगाईविरोधात काँग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर प्रशासनाने निवड प्रक्रियेसाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गुरुवारी (दि. २४) सर्व गटनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आयुक्तांच्या कार्यालयात दुपारी चार वाजता बैठक होणार असून त्यासाठी भाजपचे गटनेते श्याम बडोदे, शिंदेसेना आघाडीचे अजय बोरसे, उद्धवसेनेचे केशव पोरजे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सीमा ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

स्थायी समिती सभागृहात होणाऱ्या या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने आगामी महासभेत अंतिम घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महापालिकेत एकुण दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Manisha Khatri, Girish Mahajan,
Nashik Municipal Corporation : समित्या सभापती निवडीला लागणार मुहूर्त ; भाजपकडून पाचही पदे बिनविरोध मिळवण्यासाठी फिल्डींग

नाशिक महापालिकेत सर्वपक्षीय १२२ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे ७२, शिंदेंच्या शिवसेनेचे २६, ठाकरेंच्या शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) चार, काँग्रेसचे तीन, मनसेचा एक आणि एका अपक्षाचा समावेश आहे. संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या १० जागांमध्ये भाजपला ६, शिंदेसेनेला २, तर उद्धवसेना आणि काँग्रेसच्या शहर विकास आघाडीला २ जागा मिळण्याचे समीकरण आहे.

मात्र, भाजपकडून नियुक्तीचा निर्णय लांबणीवर पडत असल्याने कॉंग्रेसने न्यायालयात धाव घेतली त्यातून आता भाजपवरही दबाव वाढला आहे. भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी तब्बल चारशेहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी इच्छुक असल्याने भाजपकडून निर्णय होत नव्हता. भाजपने अनेकांना स्विकृत नगरसेवक पदाचा शब्द देऊन ठेवला आहे. वाद वाढू नये म्हणून भाजपने हा विषय बाजुला ठेवला होता. मात्र, आता न्यायालयीन दबावामुळे प्रशासनासनाने निवडीची प्रक्रिया सुरु केल्याने आपोआपच भाजपवर देखील दबाव वाढला असून भाजपला नावे फायनल करावी लागणार आहेत.

Manisha Khatri, Girish Mahajan,
JDCC Bank Election : जिल्हा बँकेच्या ‘पिच’वर मंत्री-आमदार उतरले; मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खडसे, चव्हाण यांचे ठराव चर्चेत..

प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या असून नियमानुसार आयुक्त प्रस्ताव महासभेपुढे मांडतात. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावल्याचे बोलले जात असून भाजप गटनेत्यांची कसोटी लागणार आहे. बैठकीत प्रत्यक्ष नावे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये कुणाला स्वीकृतची लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com