Nashik News, 26 Apr : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. केंद्र शासनाने सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
दहशतवादी हल्ल्याचे परिणाम फक्त कायदा आणि सुव्यवस्था एवढेच मर्यादित नसतात. नाशिकमध्ये यातून एक भावनिक आणि गुंतागुंतीचे प्रकरण पुढे आले आहे. पोलिसांबरोबरच शासकीय यंत्रणांना देखील या संदर्भात काय निर्णय घ्यावा असा पेच निर्माण झाला आहे.
पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या मात्र नातेवाईक भारतात असलेल्या सहा महिला आढळले आहेत. या महिलांचा वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना मुलं झाली, संसार सुरळीत सुरू आहे. त्या आता वार्धक्याकडे झुकल्या आहेत. मात्र आता त्यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
पोलिसांनी (Police) केलेल्या शोध मोहिमेत या सहा महिला आढळून आल्या. त्यांच्याकडे दीर्घकालीन मुदतीसाठी भारतात वास्तविकरण्याचा श्रेणीचा व्हीसा आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या आदेशामुळे या महिलांना आता देश सोडावा लागणार आहे. ही प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्याचे पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले.
या संदर्भात संबंधित महिलांबाबत भावनिक आणि एक किचकट समस्या निर्माण झाली आहे. कायद्याचा विचार करता त्यांना देश सोडावा लागेल. मात्र त्यांचे कौटुंबिक आणि वास्तव्य व अन्यस्थिती याचा विचार करता काय निर्णय घ्यावा ही समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे पोलिसही द्विधा मनस्थितीत आहेत.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सबंध देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्य सरकारला पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन परत पाठविण्याचे आदेश दिले. त्यातून किती किचकट प्रश्न निर्माण होत आहेत याचा हा नमुना म्हणता येईल.
अशाप्रकारे वास्तव्य करणाऱ्या महिलांबाबत कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत. अशा नागरिकांना वाहन चालविण्याचे परवाना, आधार कार्ड, अथवा मतदान कार्ड मिळत नाही. मात्र, प्रदीर्घकाळ वास्तव्य असल्याने कौटुंबिक माहिती सादर करून वास्तव्याचे नूतनीकरण करणे शक्य आहे. यासाठी केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करावा लागेल. किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे.
संबंधित माहिती पाकिस्तानात पाठवून त्याची खातर जमा केली जाते. संबंधितांचे गुन्हेगारी व अन्य घटनांची काही संबंध आहेत का याचाही तपास केला जातो. सर्व काही व्यवस्थित असल्यास संबंधितांना भारताचे नागरिकत्व देखील मिळू शकते. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना असे नागरिकत्व देण्याचे प्रयत्न सरकार करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.