Pakistani citizens in India : "लेकरांच्या उपचारासाठी मला भारतात राहू द्या..."; हतबल बापाची भारत-पाक सरकारला विनवणी

Pakistani Citizens Ordered to Leave India : पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. सार्क व्हिसा अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी पाकिस्तानला हाकलून द्या, अशी कठोर भूमिका शहांनी घेतली आहे.
Pakistani Citizens Ordered to Leave India
Pakistani Citizens Ordered to Leave IndiaSarkarnama
Published on
Updated on

Pakistani Citizens Ordered to Leave India : पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. सार्क व्हिसा अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी पाकिस्तानला हाकलून द्या, अशी कठोर भूमिका शहांनी घेतली आहे.

यासाठी त्यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संपर्क करत याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकाची सध्या देशभरात शोध मोहिम सुरू आहे. मात्र, अशातच आता एका पाकिस्तानी व्यक्तीने आपल्या दोन मुलांच्या उपचारासाठी आणखी काही काळ भारतात राहू देण्याची विनंती भारत आणि पाकिस्तानी सरकारला केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिंधमधील हैदराबाद येथील एक कुटंब आपल्या दोन मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलं आहे. त्यांच्या मुलांना हृदयविकार असून या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ते भारतात आले आहेत. नवी दिल्लीत त्यांच्या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Pakistani Citizens Ordered to Leave India
Amit Shah News : अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना केलं सतर्क; म्हणाले, एकही पाकिस्तानी...

मात्र, नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. अशातच आता भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोजून ताबडतोब पाकिस्तानला जाण्यास सांगितलं आहे.

मात्र, आपल्या दोन्ही मुलांची पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे भारतात आणखी काही वेळ राहू देण्याची परवानगी या मुलांच्या वडिलाने दोन्ही देशांकडे मागितली आहे. माध्यमांशी बोलताना मुळचते पाकिस्तानी असलेल्या दोन मुलांच्या वडील म्हणाले, माझी 7 आणि 9 वर्षांची दोन्ही मुले हृदयरोगाने ग्रस्त आहेत.

Pakistani Citizens Ordered to Leave India
Visa of Pakistan Hindus : मोठी बातमी ! भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना दिलासा, दिर्घकालीन व्हिसा वैधच...

भारतातील अद्ययावत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार सुरू आहेत. मात्र, पहलगाम येथील घटनेमुळे आम्हाला तात्काळ पाकिस्तानला जाण्यास सांगितलं आहे. मात्र, आता पुढील आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. रुग्णालय कुटुंबाला सहकार्य करत आहे. मात्र पोलिस आणि परराष्ट्र कार्यालयाने भारत सोडण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे अखेर या मुलांच्या वडिलांनी मुलांवर वैद्यकीय उपचार पूर्ण होईपर्यंत भारतात राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. शिवाय आम्ही भारतात येण्यासाठी राहण्यासाठी आणि मुलांच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com