Pankaja Munde Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde : सकाळी सासऱ्यांचा अंत्यविधी, दुपारी अश्रूंना रोखत थेट नाशिकच्या सभेत ! पंकजा मुंडेंची पक्षनिष्ठा पाहून गिरीश महाजन भारावले

Pankaja Munde Nashik : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा झाली. या सभेला भाजपच्या वरिष्ठ नेत्या व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थितीत राहिल्या.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (ता.११) जाहीर सभा झाली. गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या भाजी बाजार पटांगणावर ही सभा झाली. साधरण चार-पाच दिवस आधीच या सभेसाठी नियोजन सुरु होतं.

भाजपचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक महापालिका निवडणूक प्रभारी आहे. महाजन यांनी या सभेसाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना सभेच्या तीन-चार दिवस आधीच निमंत्रण दिलं होतं. पंकजा मुंडे यांनीही महाजन यांना होकार कळवला होता.

परंतु फडणवीसांच्या सभेच्या एक दिवस आधी संध्याकाळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सासऱ्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. सभेच्या दिवशी सकाळी अत्यंविधी होणार होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मंत्री महाजन यांना मी सभेला येऊ शकणार नाही असा निरोप पोहोचवला. कारण सभेच्या दिवशी सकाळीच अत्यंविधी होता.

पण, गिरीश महाजनांनी पंकजा मुंडे यांना सभेला उपस्थितीत राहा म्हणून खूप विनंती केली. खरं तर अशा दुखा:च्या प्रसंगात सभेला येणं अशक्यच होतं. पण तरी सुद्धा महाजन यांच्या विनंतीचा मान राखत सासऱ्यांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेऊन पंकजा मुंडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थितीत राहिल्या. सकाळी सासऱ्यांच्या अत्यंविधीचा कार्यक्रम आटोपून त्या दुपारपर्यंत नाशिकच्या सभेत पोहचल्या.

हा सगळा घटनाक्रम स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनीच नाशिकमधील सभेत बोलताना सांगितला. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांचे आभार मानले. कितक्या दु:खाच्या प्रसंगात सकाळी अत्यंविधीचा कार्यक्रम आटोपून ताई आपल्यामध्ये याठिकाणी आल्या आहेत. त्यामुळे ताईंचे खरच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो असं म्हणताना पंकजा मुंडे यांची पक्षनिष्ठा पाहून गिरीश महाजन देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

पंकजा मुंडे आणि नाशिक यांचे नाते राजकारण + संघटन + भावना या तिन्ही स्तरांवर जोडलेले आहे. भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. त्याच गोपीनाथ मुंडे यांची कन्या या नात्याने पंकजा मुंडे यांना मानणारा वर्गही तितकाच मोठा आहे. त्यात आता आगामी कुंभमेळा पाहाता भाजपला नाशिकमधील सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंची उपस्थिती पक्षासाठी महत्वाची ठरते. त्यामुळेच महाजन यांनी अशा प्रसंगातही त्यांना विनंती करुन बोलावून घेतले असावे असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT