Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपचा मोठा निर्णय, सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात अपक्ष लढणाऱ्या मुकेश शहाणेंना दाखवला बाहेरचा रस्ता

Mukesh Shahane expulsion BJP : नाशिकमधील माजी नगरसेविका अलका अहिरे, कैलास अहिरे यांच्या पाठोपाठ आता भाजपने मुकेश शहाणे यांचीही सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Sudhakar Badgujar |Mukesh ShahaneSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बंडखोराच्या विरोधात मोठा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेविका अलका अहिरे, कैलास अहिरे यांच्या पाठोपाठ आता भाजपने प्रभाग क्रमांक २९ मधील बंडखोर मुकेश शहाणे यांची देखील पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पक्षातून ६ वर्षांसाठी या बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी सांगितले. पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा शहराध्यक्ष केदार यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपाच्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळात प्रभाग क्रंमाक २९ अ मध्ये भाजपकडून माजी नगरसेवक मुकेश शहाणे व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर या दोघांना एबी फॉर्म दिले गेले होते. या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म जोडले होते. मात्र छाननी दरम्यान शहाणे यांचा अर्ज बाद झाला. कारण दीपक बडगुजर यांनी शहाणे यांच्याआधी एबी फॉर्म सादर केला होता. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून दीपक बडगुजर यांची निवड झाली.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Nashik NMC Election : दीपक बडगुजर विरुद्ध मुकेश शहाणेंमध्ये होणार 'टाइट फाइट', कोण कुणाला करणार चितपट?

मात्र मुकेश शहाणे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांच्याविरोधात प्रभाग क्रमांक २९ 'अ' मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांना माघार घेण्याची सूचना करुनही त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. या प्रकरणी माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची पक्षाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचे कळविले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक पक्षशिस्तीचा भंग केल्याचे भाजपने म्हटले आहे.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Devendra Fadnavis : 'गंगेचं पाणी पिणार नाही सांगतात अन् गोदातीरी येऊन भाषणं करतात', देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंवर सोडला बाण

दरम्यान पक्षाने केलेल्या या कारवाईनंतर मुकेश शहाणे यांनी त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कामे केली तसेच पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, असे असताना भाजपने माजी हकालपट्टी करून एकनिष्ठेचे फळ दिले आहे. भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने कारवाई केली जात असेल तर भाजपचे हे कृत्य चिंतनीय आहे असे शहाणे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com