Pankaja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pankaja Munde silent sitting Sai temple : पिवळी साडी, मोकळे केसं अन् निर्विकार चेहरा; पंकजा मुंडेंचं साईंच्या गुरूस्थान मंदिरांच्या पायऱ्यांवर वेळचं रूप...

Pankaja Munde Sits Silently at Shirdi Sai Samadhi Gurusthan Temple Steps : अमित शहा आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असून, राज्य मंत्रिमंडळात बहुमतांशी मंत्र्यांनी शिर्डी इथं साई समाधीचं दर्शन घेतलं.

Pradeep Pendhare

Pankaja Munde Shirdi visit : राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचं वेगळचं स्थान आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधून केलेला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांच्यानंतर मुंडे परिवाराचा राजकीय वारसा त्यांची कन्या पंकजा मुंडे नेत आहे. प्रतिम मुंडे देखील पंकजा यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.

मात्र पंकजा मुंडे यांचा राज्याच्या राजकारणात वेगळाच राजकीय दबदबा आहे. ओबीसींच्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. पण भाजपमधील एक आक्रमक असलेला चेहरा अलीकडच्या काळात राजकारणात सक्रिय असताना, खळखळाट खूपच कमी केला आहे. राजकारणात नेत्यानं त्याच्या निर्णयाचा तळ विरोधकांना शोधून द्यायचा नसतो, तोच राजकारणात यशस्वी होतो. तसंच काहीसं भाजप मंत्री पंकजा मुंडे यांची राजकीय वाटचाल करीत असल्याचा अनुभव आज संपूर्ण राज्यानं घेतला.

अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहाता आणि कोपरगाव इथं वेगवेगळी राजकीय कार्यक्रमाचं, विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्री रात्रीत शिर्डीत मुक्कामाला आहेत. 'डिनर डिप्लोमसी' करत आगामी राजकारणाला दिशा दिली. यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार अमित शहा यांचा सकाळपासून दौरा सुरू केला आहे.

अर्थात, अमित शहा यांनी सुरूवातीला शिर्डी (Shirdi) इथं साईसमाधी मंदिरात जात साईसमाधीचं दर्शन घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे देखील होत्या. पण यावेळी त्यांचं वेगळच रूप अनुभवायला मिळालं.

अमित शहा यांना साईसमाधी मंदिरात येण्यापूर्वीच मंत्री पंकजा मुंडे यांनी मंदिरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पिवळी साडी परिधान केली होती. केसं मोकळी होती. चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत, त्यांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी थेट साई मंदिरातील गुरूस्थान मंदिर गाठलं. तिथं त्या बराच वेळ एकट्या बसल्या होत्या. गुरूस्थान मंदिरातील पायऱ्यांवर त्या शांत बसून होत्या. यावेळी त्यांचा चेहरा एकदम निर्विकार होता.

पंकजा मुंडे गुरूस्थान मंदिरातील पायऱ्यांवर एकट्यात शांत बसल्याचं पाहून मंदिरातील भाविकांमध्ये चर्चा होती. काहींनी त्यांचा व्हिडिओ अन् फोटो काढले. याचवेळी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पंकजा मुंडे या गुरूस्थान मंदिरात एकट्याच शांत बसल्या असल्याची चर्चा पोहोचली.

स्नेहलता कोल्हेंची पंकजांच्या दिशेनं धाव

तिथं भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. त्यांनी तडक पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्या. शांत बसलेल्या पंकजा यांच्याकडे जात आदरानं, आपुलकीनं, मायेनं त्यांच्या शेजारी जाऊन बसल्या. स्नेहलता कोल्हेंनी हळूवारपणे पंकजा यांच्याशी संवाद साधला. साई मंदिरातील या प्रसंगाची भक्तांबरोबर भाजपच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा गुरूस्थान मंदिरातील पायऱ्यांवर शांतपणे बसलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंडे परिवारामध्ये फूट

राज्यातील राजकारणात मुंडे परिवाराचा वेगळाच दबदबा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परिवारामध्ये फूट पडली होती. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बीडच्या परळीत मुंडेविरुद्ध मुंडे असा सामना सर्वांना अनुभवला. धनंजय मुंडे विजयी झाले. पुढे मंत्री झाले. या काळात पंकजा राजकारणापासून काहीशा लांब थांबल्या. हळूहळू सक्रिय होत असतानाच, पंकजांसाठी कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेतली. आता पंकजा विधान परिषदेवर असून, त्या मंत्रिमंडळात आहेत.

बीडवर जास्त लक्ष

भाजपमध्ये मंत्री पंकजा मुंडे रमल्या आहेत. मध्यंतरी कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्यासमोर मुख्यमंत्री लावायला सुरूवात केली होती. त्यातून भाजप अंतर्गत त्यांच्याविरोधात संघर्ष उफाळला होता. तो आता शांत झालेला आहे. मंत्री मुंडे यांच्यावर जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी आहे. तरी देखील पंकजा यांचं बीडवर लक्ष असतं. अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय दिसतो आहे.

धनंजय मुंडेंसमोरील आव्हान

राष्ट्रवादी फुटली. धनंजय मुंडे अजित पवारांबरोबर आहेत. महायुतीच्या मंत्रिमंडळात संधी मिळली. पण, वाल्मिक कराडमुळे अडचणीत सापडलेल्या मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यात एक झालं, मुंडे बहिणभाऊ एकत्र आले. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे परिवार सक्रिय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. बीडमध्ये मुंडे बहिणभाऊ महायुतीत राहून कोणता निर्णय घेतात, याकडे आता लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT