Nilesh Lanke Vs BJP Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke Vs BJP Sujay Vikhe : काहींची पुरती जिरली तरी..; खासदार लंकेंनी विखेंना डिचवलं

Parner Bazar Samiti Meeting MP Nilesh Lanke Criticizes BJP Sujay Vikhe : पारनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध कामांच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार नीलेश लंकेंनी माजी खासदार सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar MP Nilesh Lanke news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

"काहींची पुरती जिरली तरी, ते टिका-टिपन्नी करण्याचे सोडत नाहीत. म्हणतात ना की, सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही. ज्यांनी काही एक सामाजिक काम केले नाही ते, टिका-टिपन्नी करतात," असा टोला खासदार लंकेंनी नाव न घेता विखे पाटलांना लगावला आहे.

पारनेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच विविध कामांच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्ताने खासदार लंके (Nilesh Lanke) बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभापती किसनराव रासकर, बाबाजी तरटे, सुदाम पवार, अशोक कटारिया, मारूती रेपाळे, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे आदी उपस्थित होते.

खासदार लंके म्हणाले, "1981 मध्ये बाजार समिती सुरू झाली. विविध आमदारांनी या समितीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. निवडणुकीनिमित्ताने शेतकऱ्यांच्या (Farmer) अडचणी लक्षात आल्या. बाजार समितीची सत्ता हाती आल्यानंतर शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला आपण सार्थ होऊ की नाही हा प्रश्न होता. मात्र संचालक मंडळोने हा विश्वास सार्थ ठरवला." पूर्वी बाजार समितीचा नफा 27 लाख होता. आज मात्र पहिल्या वर्षात 1 कोटी 32 लाख तर, दुसऱ्या वर्षी 2 कोटी 17 लाखांचा नफा आहे. तसेच 3 कोटींच्यावर ठेवी असून त्यातून 25 लाख रूपये व्याज मिळते, असा या संचालक मंडळाचा कारभार पारदर्शक असल्याचे कौतुक खासदार लंके यांनी केले.

प्रतिकुल परिस्थितीमध्ये बाजार समिती सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आज ही बाजार समिती सुस्थितीत आहे. भाळवणी इथं व्यापाऱ्यांनी एक दिवस कांदा लिलाव सुरू करावेत. जागेच्या बाबतीत 4 हेक्टर 32 (आर) जागेची मागणी करण्यात आली असून नवी जागा उपलब्ध होणार असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

सुसंस्कृतपणावर घाला...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली. यावर खासदार लंके म्हणाले, "एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. हल्ली राजकारणात सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. राज्याच्या सरकारमधील जे जबाबदार राज्यामध्ये फिरतात. त्यांना समाजात चिथावणी देण्यासाठी पाठवलेले असते. ते वेगवेगळ्या नेते मंडळींवर खालच्या पातळीवर बोलतात. काल जयंत पाटील यांच्यावर, मध्यंतरीच्या काळात सुप्रियाताईंवर, शरद पवार यांच्याविरोधात देखील यांनी वक्तव्य केलीत." वेगवेगळया मार्गाने वातावरण दूषित केले जात आहे. राज्य सरकारमधील प्रमुखांना माझी विनंती आहे, तुम्हाला आता चांगले वाटत असेल. परंतु यामुळे तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा घालत आहात. त्याचा तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार लंकेंनी दिला.

बिहारच्या दिशेने...

महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे न शोभणारे आहे. 35 वर्षे सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या नेत्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या संयमी व्यक्तिबद्दल बोलणे चुकीची आहे. महाराष्ट्राची संस्कृती बिहारच्या दिशेने वाटचाल करते आहे, असे दिसते. मात्र चुकीच्या वक्तव्याचा निषेध केलाच पाहिजे. जिल्हा राष्ट्रवादी तसेच बाजार समितीच्यावतीने मी त्या आजी आमदारांचा निषेध करतो, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT