Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News
Girish Mahajan News, Jalgaon Latest Marathi News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कार्यकर्त्यांनो, जिल्हा परिषदेसाठी कामाला लागा!

Sampat Devgire

यावल : आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, (ZP Elections) पंचायत समिती व पालिका निवडणुकीसाठी भाजपला (BJP) पोषक वातावरण असून, केंद्र शासनाच्या योजना (Centre Agencies) तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामास लागावे, असे आवाहन माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. (BJP leaders said BJP workers shall active for coming elections)

येथील व्यास मंदिर परिसरात जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात भाजपचा मेळावा घेण्यात आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यासह शहराची आढावा बैठक झाली. (Girish Mahajan News in Marathi)

या बैठकीत पक्ष संघटन, बूथरचना व आगामी येणाऱ्या निवडणुका तसेच विविध विषयांवर माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे व खासदार रक्षा खडसे आदींनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच तालुक्यात झालेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सभासदांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

या वेळी माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT