Maharashtra onion policy committee latest news: गतवर्षी कांदा भाव आणि वितरणाचा गंभीर प्रश्न राज्यात निर्माण झाला होता. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कांदा प्रश्नावर उपाय करण्यासाठी कांदा धोरण समिती जाहीर केली होती. पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील या समितीला दीड महिन्यात अहवाल देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या समितीने दीड वर्ष होऊनही अहवाल आलेला नाही.
यंदा पुन्हा कांद्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेने केलेल्या कांदा खरेदीवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप होत आहे. गेल्या महिन्यात खरेदी केलेला कांदा सडल्याने खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे यांनी केंद्र शासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांनी पुन्हा एकदा अहवाल देण्याचे टाळले आहे. पटेल आता गुजरातचा दौरा करणार आहेत. गुजरात राज्यात कांदा प्रक्रिया कशी होते? त्याचा काय उपयोग करायचा याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना संतापली आहे. पाशा पटेल यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत का? ते वेळ खाऊ धोरण राबवत दौरे आणि बैठका का घेत आहेत? राज्य शासनाला अहवाल देण्याचे का टाळतात? असा गंभीर प्रश्न विचारण्यात आला.
पाशा पटेल आता बांबूची चटणी महाराष्ट्रात कशी आणायची? याचा तर विचार करत नसावेत ना? असा उपरोधिक प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश समन्वयक कुबेर जाधव यांनी केला आहे. पाशा पटेल हे शेतकरी प्रश्न सोडवण्याऐवजी वेगळ्याच कामांमध्ये गुंतलेले दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाल्याचे जाधव यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी नियुक्त केलेले या समितीला कांद्याची साठवणूक आणि वितरण यामध्ये सुसूत्रता व समन्वय यासाठी सूचना करणे अपेक्षित होते. कांद्याचे दर कोसळल्याने निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी ही समिती नियुक्त केली होती. आता या समितीचा हेतूच विफल झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पणनमंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याची सूचना समितीला केली होती. त्यात समिती अपयशी ठरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.