Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे वांबोरी चारीच्या श्रेयवादावरून विरोधकांवर चांगलेच संतापले आहेत. माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या राजकीय स्टंटबाजीवर निशाणा साधला आहे.
साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला, पण नेता म्हणून सोशल मीडियावर मिरवणारा, वांबोरी चारीचे बटन दाबून फोटोसेशन करणारा सरकारचे जावई आहेत का? जनाची नाही, तर मनाची ठेवा, असा टोला आमदार तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र अक्षय यांना लगावला आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे पाथर्डीतील एका कार्यक्रमात बोलत असताना शेतकऱ्यांसाठी (Farmer) जिव्हाळ्याचा मुद्दा असलेल्या वांबोरी चारीच्या पाण्यावर बोलले. तनपुरे यांनी यावर थेट शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र अक्षय यांच्यावर निशाणा साधला. आमदार असून देखील पाच वर्षात एकदाही वांबोरी चारीचे बटन एकदाही दाबले नाही. परंतु दुष्काळी भागाला चारीतून पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत पाणी कमी देणाऱ्यांनी स्टंटबाजी करत प्रसिद्ध चांगलीच मिळवली आहे. त्यांना बटन दाबण्याची हौस आहे. आता तर मुलाला देखील पुढे केले आहे, असा टोला आमदार तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांना लगावला.
मुळा धरण अजून 100 टक्के भरलेले नाही. त्यामुळे ओव्हर फ्लोचे पाणी लाभधारक शेतकऱ्यांना देताना अडचणी येत आहेत. वांबोरी चारीतील नादुरुस्तीची तिसरी मोटार दुरुस्तीची मागणी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन केली आहे. ती मोटार चालू केल्याशिवाय पाथर्डीपर्यंत पाणी येऊ शकत नाही. पाथर्डीच्या तिसगाव आणि मढीपर्यंत पाणी पोचू शकत नाही, हे माहीत असताना देखील राजकीय स्टंटबाजीसाठी फोटोसेशन केले गेले. विरोधकांच्या उद्योगांना कोणी रोखू शकत नाही. नारळ कोणीही फोडू द्यात, चारी दोनच्या टप्प्याचा पाठपुरावा मीच केला आहे, असे आमदार तनपुरे यांनी म्हटले.
अक्षय कर्डिले यांनी नऊ ऑगस्टला वांबोरी चारीचे बटन दाबून पाणी सोडले. "वांबोरी चारीचे पंपांची दुरुस्ती झाली असून तिसरा पंप देखील दुरुस्त झाली आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी ही योजना सुरळीत होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. पालकमंत्र्याच्या आदेशानेच वांबोरी चारीतून पाणी सोडले जात आहे. सध्या निवडणुकीचा काळ असून विरोधक वांबोरी चारीबाबत आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र जनतेला लाभधारक शेतकऱ्यांना योजनेसाठी कोणाचे सहकार्य आहे, याची माहिती आहे", असे अक्षय कर्डिले यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.