Lahu Kanade : ससाणे-ओगलेंचे आव्हान पेलवेना; मुरकुटेंच्या भेटीतही आमदार कानडेंच्या पदरी निराशा?

MLA Lahu Kanade met Bhanudas Murkute : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार लहू कानडे यांना पक्षातील युवांकडून आव्हान मिळू लागले आहे. यावर आमदार कानडे यांनी गाठीभेटी वाढवल्या असून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भेट घेतली.
Lahu Kanade
Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राजकारणात कोणी कोणाचा शत्रूही नसतो अन् मित्रही! वेळ आल्यावर सारीपाटावरी सोंगट्या सु्द्धा डाव पडतात. तसंच काही श्रीरामपूरमधील राजकीय पटलावर होत आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटींचा जोर वाढला आहे. ही त्यांची प्राथमिक फेरी एकमेकांच्या चाचपणीची दिसते. याची झलक काँग्रेसचे आमदार लहू कानडे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या भेटीतून पहायला मिळाली.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली, तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. काँग्रेसचे (Congress) आमदार लहू कानडे यांना स्वपक्षातूनच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी आव्हान दिले आहे. यासाठी त्यांना माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे पाठबळ आहे.

कानडे आणि ओगले यांनी स्वतंत्रपणे संवाद यात्रा काढत मतदारसंघातील ग्रामस्थं, शेतकरी आणि युवकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कानडे गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकास कामाच्या शिदोरीवर मतदारांना सामोरे जात आहेत. दुसरीकडे कानडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत ओगले मतदारांना गळ घालत आहेत. काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्येच जुंपल्याने श्रीरामपूरचा राजकीय पटल हलू लागला आहे.

Lahu Kanade
Radhakrishna Vikhe : ठाकरेंचा दिल्ली दौरा आश्चर्यकारक; मंत्री विखेंनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणाऱ्यांना देखील फटकारलं

काँग्रेसमधील या सर्व राजकीय उलथापालथीवर आमदार कानडे यांनी माजी आमदार मुरकुटे यांची अशोक बँकेच्या कार्यालयात भेट घेत चर्चा केली. आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगत कानडे यांनी मुरकुटे यांना आपलेसे करण्याचा यावेळी प्रयत्न केला. मात्र, मुरकुटे सलग तीनदा आमदार आणि गेली 35 हून अधिक वर्षे अशोक कारखान्याचा कारभार पाहत आहेत. श्रीरामपूरच्या राजकारणातील मुरलेला हा नेत्याकडून आमदार कानडे यांना काय मंत्र मिळाला, याची चर्चा आहे.

Lahu Kanade
Ram Shinde : 'लाडकी बहीण'वरून गैरसमज पसरवल्यास, गाठ माझ्याशी; राम शिंदेंनी विरोधकांना सुनावलेच...

माजी आमदार मुरकुटे या दिग्गज नेत्याकडून आमदार कानडे यांना त्याच पद्धतीनं प्रतिसाद मिळाला. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. कोणाला उमेदवारी मिळते हेही निश्चित नाही. अजून बराच कालावधी जायचा आहे. त्यामुळे उमेदवारी कशी आणि कोणाला मिळते, तसेच कोणत्या पक्षाकडून, यावरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगून मुरकुटे यांनी कानडे यांना वेट अ‍ॅण्ड वाॅचचा सल्ला दिला.

लोकसभा निवडणुकीनंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात बरच काही घडलं. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. हेमंत ओगले युवा नेतृत्व आहे. ते यावेळी थांबायला तयार नाहीत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे येथील विद्यमान आमदार लहू कानडे यांना त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपात आव्हान मिळू शकते. यातच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे देखील युवा आहेत. ससाणे यांनी ओगलेंना बळ दिले आहे. आता या जोडगोळीला आमदार लहू कानडे ज्येष्ठ म्हणून समावून घेतात की, प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देतात, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com