Madhi Kanifnath Yatra 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Madhi Kanifnath Yatra: मढी ग्रामपंचायतीची 'त्या' ठरावाने डोकेदुखी वाढवली; आता मंत्री नीतेश राणेंकडे धाव

Madhi Gram Panchayat Resolution: पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे उद्या मढीतील मानाची होळी पेटवण्यासाठी येणार आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : पाथर्डीतील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा मढी ग्रामपंचायतीचा ठराव राज्यासह देशात गाजत आहे. या ठरावाविरोधात विरोधकांच्या तक्रारीनंतर पंचायत समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

एखाद्या धर्माच्या विरोधात, असा ठराव घेता येणार नसून, मढी ग्रामपंचायतीने तसा ठराव घेऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा निष्कर्ष पंचायत समितीने नोंदवला आहे. हा ठराव आता कायदेशीर अडचणीचा ठरू लागल्याने आता मढी ग्रामपंचायतीने भाजप मंत्री नीतेश राणेंकडे धाव घेतली आहे. मंत्री राणे मढीत शुक्रवारी येणार असून, त्याचवेळी ते भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप मंत्री नीतेश राणे राज्यात कडवट हिंदुत्व घेऊन फिरत आहेत. जिथं हिंदुत्वाची मुद्दा येतो, तिथं मंत्री राणे असतात. तसे मंत्री राणे यांनी देखील हिंदुत्वाच्या मुद्यावर मला कधीही बोलवा, मी तिथं हजर असेल, असे सांगतात. हिंदुत्वाच्या मुद्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात काढण्यात आलेल्या सकल हिंदू समाज मोर्चात मंत्री राणे सहभागी झालेले आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

पाथर्डीतील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेत बंदीचा ठराव गाजतो आहे. या ठरावाविरोधात तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पंचायत समितीने चौकशी सुरू केली आहे. मढी ग्रामपंचायतीला हा ठराव कायदेशीर अडचणीचा ठरू लागला आहे. पंचायत समितीने केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीने ठरावात नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्कर्ष नोंदवला आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड यांनी मात्र ठरावावर भूमिका कायम ठेवली आहे. ठराव कायदेशीर आणि बरोबर आहे. मढीत कोणाचाही अवमान केला जात नाही. आमच्या भावना पायदळी तुडवल्या जात असतील, तर आम्ही सहन करणार नाही. आता माघार नाही, अशी भूमिका सरपंच संजय मरकड यांनी मांडली आहे.

मंत्री राणे काय भूमिका घेणार

या ठरावाला राजकीय पाठिंबा मिळवा, यासाठी मढी ग्रामपंचायतीमधील लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. भाजप मंत्री नीतेश राणे यांना यासाठी संपर्क केल्याचे समजते. मंत्री राणे शुक्रवारी (ता. 28) मढीत येणार आहे. यात्रोत्सवानिमित्ताने त्यांच्या हस्ते मानाची होळी पेटवली जाणार आहे. याचवेळी मढी ग्रामपंचायतीच्या ठरावावर मंत्री राणे भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री राणेंची भूमिका काय असेल, यावर आता अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

आमदार जगतापांचा पाठिंबा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. अशी भूमिका योग्यच आहे. त्यांना काही कमतरता झाली, तर आम्ही हिंदू म्हणून तिथे जाऊ. हिंदू धर्मस्थळावर काही समाजकंटकांकडून ते आमचे देवस्थान आहे. आता हे खपवून घेणार नाही. मुस्लिमांना एकही दुकाना लावून न देण्याच्या भूमिकेचे मढी ग्रामपंचायतीचे स्वागत करतो, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT