Rajabhau Waje
Rajabhau Waje  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena; जनतेच्या भावना आजही शिवसेनेसोबतच

Sampat Devgire

सिन्नर : शिवसेना (Shivsena) पक्ष स्थापन होऊन ५६ वर्ष झाली आहेत, शिवसेनेची नाळ तळागाळातील माणसांसोबत (Common people) जोडली गेल्याने सध्याचा कालखंड अवघड असला तरी सर्वसामान्य जनतेच्या सदभावना आज शिवसेनेसोबतच असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी केले. (Party Workers, Common people are connected with Shivsena in Sinner)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दर दोन वर्षांनी सदस्य नोंदणी केली जाते. तालुक्यात पक्षाचे वीस हजार सदस्य आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार पक्षाची ही मैदानावरील लढाई नसून कोर्ट आणि कागदपत्रे यामधील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन वाजे यांनी केले.

युवा नेते सांगळे यांनी शिवसेनेने आतापर्यंत अनेक आव्हाने पाहिले आहेत. प्रत्येक वेळी जनतेने शिवसेनेला ताकद दिली आहे, पक्षात मतमतांतरे असतील, मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. ठाकरे यांची मुंबई येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आजही सर्वसामान्य लोक शिवसेनेसोबत असून त्यामुळेच सर्व ठिकाणाहून पक्षाला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगळे म्हणाले. पिराजी पवार यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ पावसे यांनी आभार मानले.

यावेळी शहरात बजूनाथ शिरसाट, रावसाहेब आढाव, लक्ष्मण बर्गे, हर्षल काळे, बाबूराव सुरुडकर, सचिन करपे, शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटक कल्पना रेवगडे, मेघा पावसे, छाया शिंगोटे, अश्विनी भाकरे आदींसह नागरिक उपस्थित होते. सरदवाडी मार्गावरील संजीवनीनगरात माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी उपक्रम राबवला.

यावेळी युवानेते उदय सांगळे, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, माजी तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, विजय जाधव, उदय गोळेसर, संजय सानप, किरण कोथमिरे, पिराजी पवार, अण्णा पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT