उद्धव ठाकरेंना बंडखोर आमदाराच्या भगिनीची निष्ठेची मोठी भेट!

एकनाथ शिंदेच्या गटात गेलल्या आमदार किशोर पाटील यांच्या राजकारणाला ग्रहण लागणार?
Kishor Patil, Uddhav Thakrey & Vaishali Suryawanshi
Kishor Patil, Uddhav Thakrey & Vaishali SuryawanshiSarkarnama
Published on
Updated on

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीत राज्यातील शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार सहभागी झाले. यातील आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांना काल मोठा राजकीय हादरा बसला. आमदार फुटले मात्र भगिनी वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांच्यावर निष्ठा व्यक्त करीत आमदार पाटील यांना घरातूनच आव्हान दिले. श्री ठाकरे यांना वाढदिवसाला मिळालेले हे सर्वात मोठे गिफ्ट ठरले आहे. (Kishor Patil`s Future politics may come in trouble by sisters move)

Kishor Patil, Uddhav Thakrey & Vaishali Suryawanshi
Shivsena; `उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, भविष्यातही तेच राहतील`

शिवसेनेची हिदूत्व व मराठी माणसांची मतपेढी फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाची फूस असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र सोडून गेलेले आमदार पुढे येऊन शिवसेनेवरच टिका करू लागल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत होता. परंतु या चाळीस आमदारांच्या राजकारणालाच धक्का देण्याचे काम पाचोरा येथील (कै) आर. ओ. पाटील यांच्या वारस व आमदार किशोर पाटील यांच्या भगिनीने दिला आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत आमची निष्ठा शिवसेनेशीच असे होर्डींग्ज त्यांनी मतदारसंघात लावले. त्यामुळे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार किशोर पाटील यांच्या राजकारणाला ग्रहण लागण्याची भिती आहे.

Kishor Patil, Uddhav Thakrey & Vaishali Suryawanshi
दोन आमदार निवडीची शिवसैनिकांमध्ये ताकद

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व निर्मल उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छापर जाहिराती देऊन व मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून ठाकरे गटाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर. ओ. पाटील यांचे राजकीय वारसदार समजले जाणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना कुटुंबातूनच कडवे आव्हान उभे ठाकले असून, तालुक्यातील राजकारणात नव्या समीकरणाची नांदी ठरू पाहात आहे.

आमदार किशोर पाटील गेल्या महिन्यात झालेल्या राजकीय नाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रथमपासूनच सहभागी झाले. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई अशा शिंदे गटाच्या प्रवासात ते सक्रिय होते. शिंदे गटात गेल्यावर त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची निषेध आंदोलने अथवा विरोध दर्शवणारी भूमिका मतदारसंघात व्यक्त झाली नाही. उलट आमदार पाटील यांच्या समर्थकांनी ‘न भूतो न भविष्यति’ समर्थन रॅली काढून कमालीचे शक्तिप्रदर्शन केले. अगदी परवा परवाच मुंबई येथील यशवंतराव सभागृहात आमदार पाटील यांनी मेळावा घेत मतदारसंघातर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार घडवून आणला. सत्तांतर नाट्यानंतर आमदार पाटील मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी आपल्या कामांचा, बैठकांचा धडाका लावला.

या साऱ्या गोष्टी घडत असताना आमदार पाटील यांच्या चुलत भगिनी व माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कमालीची जाहिरातबाजी करून आपण ठाकरेंसोबत असल्याचा संदेश द्विगुणित केला. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रमुख वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती व मतदारसंघात लावलेले भलेमोठे डिजिटल बॅनर राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे ठरले आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे आमदार पाटील व माजी आमदार (स्व.) आर. ओ. पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय वारसदार ?

आमदार पाटील प्रथमपासूनच शिंदेंसोबत असून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक आहे. आतापर्यंत पाच ते सहावेळा ते किशोर आप्पा यांच्या निवासस्थानी येऊन गेले आहेत. मात्र, सर्व घडामोडीत वैशाली सूर्यवंशी कोठेच दिसल्या नाहीत. आमदार किशोर पाटील यांच्यासह समर्थकांना मंत्रिपदाची आस लागलेली असताना वैशाली सूर्यवंशी यांनी टाकलेला राजकीय बाँब हादरा देणारा ठरला आहे. त्यांच्या जाहिरातीतून विचार, एकनिष्ठता व वारसा अशा शब्दांचा वापर करून ‘तत्त्वांशी नाही केली तडजोड, विचारांशी सदैव एकनिष्ठ... आणि आता तोच विचारांचा वारसा’ असे शब्दप्रयोग करण्यात आला आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com