Civil rights committy with Mayor Pradeep Karpe
Civil rights committy with Mayor Pradeep Karpe
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: समस्या कळल्या ना; आता ‘रिझल्ट’ दाखवा!

Sampat Devgire

धुळे : महापालिकेत (Municiple Corporation) महापौरांसह अधिकारी आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी संयुक्त बैठक झाली. त्यात समितीने जनहिताशी निगडित ३२ समस्यांची जंत्री मांडली. या समस्या महापालिकेलाही (NMC) अवगत आहेत. त्यामुळे महापालिकेने आता ‘रिझल्ट’ दाखवावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त झाली. (People present 32 types of issues with Dhule mayor)

शहर विकासाला आणखी दिशा मिळावी आणि धुळेकरांच्या मनातील ज्वलंत समस्या नागरी हक्क संरक्षण समितीने महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांच्याशी चर्चा केली.

समस्यांची जंत्री

श्री. घुगे यांनी समस्या मांडल्या. त्यात शहरातील पाणीपुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करावे, आठ- दहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अलीकडे आणावा, रात्री- अपरात्री पाणीपुरवठा न करता वेळेचे नियोजन करावे व दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करावा, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, रस्त्यांवरील दुतर्फा अतिक्रमण हटवावे, वाहतुकीला अडसर ठरणारे वीजेचे खांब हटवावे, गतिरोधक नियमाप्रमाणे करावे, भूमीगत गटार योजनेबाबत वस्तुस्थिती जाहीर करावी, मोकाट विविध प्रकारच्या जनावरांना पायबंद घालावा, पाचकंदिलसह भाजी विक्री ठिकाणी स्वच्छतेवर भर द्यावा याबाबत निवेदन दिले.

शहरातील आग्रा रोडवरील हॉकर्सची पर्यायी व्यवस्था करावी, हद्दवाढीतील गावांच्या समस्या सोडवाव्यात, नवीन बांधकाम परवानगी देताना वाहतुकीला अडसर होईल व अपघाताला निमंत्रण मिळेल अशा पद्धतीने रस्त्यावर टाकलेली वाळू, खडी, विटा टाकण्यास प्रतिबंध करावा, सिग्नल सुरू करावे, महिलांसाठी देवपूरसह आवश्‍यक ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी, घंटागाड्यांचे नियोजन करावे, टॉवर गार्डनचे बंद केलेले काम सुरू करावे, शाहू महाराज नाट्यमंदिराची दुरुस्ती करावी व एसी व्यवस्था सक्षम करावी आदी विविध समस्यांची जंत्रीच मांडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी, काही नगरसेवकांसमक्ष मांडल्या. समितीचे अध्यक्ष निवृत्त अधीक्षक अभियंता हिरालाल ओसवाल, सरचिटणीस महेश घुगे, निवृत्त अधीक्षक अभियंता प्रभाकर पाटोळे, सदस्य व धन्वंतरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश गिंदोडिया, ॲड. चंद्रकांत येशीराव, एस. टी. चौधरी, शरद शिंपी, योगेंद्र जुनागडे, प्रा. जसपाल सिसोदिया, जयेश बाफना, डॉ. संगीता गिंदोडिया, उमा घुगे, विजय अग्रवाल, नीलेश भावसार, प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT