Dhule news: अतिक्रमणाबाबत शिवसेनेने भाजपच्या महापौरांना धारेवर धऱले!

धुळे शहरातील कृष्णनगरातील अतिक्रमणप्रश्‍नी महापौर प्रदीप कर्पे यांना शिवसेनेच्या आक्रमक आंदोलकांनी इशारा दिला.
Dhule mayor Pradeep Karpe
Dhule mayor Pradeep KarpeSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शहरातील (Dhule) कृष्णनगर येथे एखादे- दुसऱ्या अडचणीतील घरामुळे अनेक रहिवाशांना वहिवाटेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर उपचार करण्याऐवजी महापालिकेच्या Dhule corporation) अतिक्रमण निर्मुलन पथकाने सरसकट सरासरी ५० हून अधिक नागरिकांना नोटीस बजावली आहे. (Encroachment in city is a serious issue)

Dhule mayor Pradeep Karpe
NCP News: फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची तात्काळ मदत द्या!

यासंदर्भात शिवसेनेने आंदोलन करत महापालिकेला संबंधित ५० जणांना बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. अतिक्रमणांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना चांगलेच धारेवर धरत प्रश्न विचारले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मान्य करत अडचणीच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Dhule mayor Pradeep Karpe
Malegaon News: भाजपने राज्यपालांची हाकालपट्टी न केल्यास महागात पडेल

साक्री रोडवरील मोगलाई भागातील कृष्ण नगरात ५० वर्षांपासून अल्प उत्पन्न गटातील सुमारे ५० हून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. ते सफाई कामगार, हातमजुरीसह दारिद्र्य रेषेखालील घटक आहेत. या परिसरातील दोन नागरिकांमध्ये आपापसांत अतिक्रमणाबाबत वाद आहे. या वादाचे निराकरण न करता महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाने जुन्या ५० घर मालकांना नोटीस बजावत त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली.

या विरोधात शिवसेनेने संबंधित रहिवाशांसह महापौर प्रदीप कर्पे आणि आयुक्त देविदास टेकाळे यांच्याशी चर्चा केली. अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख प्रसाद जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जाधव हे पदाचा दुरुपयोग करत असल्याची तक्रार केली.

महापौर, आयुक्तांनी तक्रारीवर चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, प्रसंगी अडथळा नसलेल्या अतिक्रमणधारकांना बजावलेली नोटीस मागे घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, शहर समन्वयक भरत मोरे, सहसमन्वयक संदीप सूर्यवंशी, उपमहानगरप्रमुख महादू गवळी, छोटू माळी, सुरेश चौधरी, आनंद जावडेकर आदींसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com