PM Narendra Modi in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

PM Narendra Modi News : नाशिकच्या दौऱ्यात 'ओन्ली मोदी', अन्य नेते साईड ट्रॅक?

Sampat Devgire

Narendra Modi Nashik Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज नाशिक येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. रोड शो, रामतीर्थाचे पूजन, काळाराम मंदिरात दर्शन आणि भजन हे कार्यक्रम आटोपले. मात्र, या सर्व कार्यक्रमात फोकस होते, फक्त नरेंद्र मोदी.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ निलगिरी बाग येथे लँडिंग नंतर रोड शो होता. यापूर्वी ओझर विमानतळावरच मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रोटोकॉल नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. शहरात मोदी यांचा निलगिरी बाग ते संत जनार्दन स्वामी मठ या 1.7 किलोमीटर अंतराचा रोडशो झाला.

यावेळी नागरिकांनी आणि युवकांनी मोदी यांचे 'जय श्रीराम' लिहिलेल्या भगव्या टोप्या, भगवे ध्वज आणि फलक घेऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या घोषणांमध्ये 'मोदी- मोदी', 'जय श्रीराम', या घोषणा होत्या. मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांबाबत उपस्थितांमध्ये काहीही प्रतिक्रिया दिसून आल्या नाहीत. (Nashik News)

पंतप्रधान मोदी यांनी रामतीर्थवर जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गोदावरीला अर्घ्य अर्पण केला. त्यानंतर काळाराम मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. काही साधूंच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी राम रक्षा एक पाठ म्हटला. या सबंध कार्यक्रमांमध्ये केंद्र सरकारच्या खास मीडियाला चित्रीकरणाची संधी होती. त्यांचा सर्व फोकस फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी होता. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य कोणत्याही मंत्र्यांना मोदी यांनी आपले कार्यक्रम करताना जवळपासही ठेवले नाही, हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विविध दूरचित्रवाहिन्या, स्थानिक मराठी वाहिन्या, माध्यमांचे छायाचित्रकार या सगळ्यांना हा कार्यक्रम कव्हर करण्याची प्रचंड उत्सुकता होती. मात्र सुरक्षा व्यवस्थेने पास देऊन देखील या छायाचित्रकारांना सबंध कार्यक्रमात किमान चारशे ते पाचशे फूट लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना चित्रण करण्यात देखील विविध अडचणी आल्या.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT